आनंदा बॅनर्जी
अनुवाद- परिक्षित सूर्यवंशी
फोटोग्राफ्स – आनंदा बॅनर्जी
|
वसंत ऋतू सुरु झाला कि रामगंगा
नदी मागे सरकायला लागते आणि ढिकालाचा गवताळ प्रदेश प्रकट होतो. |
वसंत ऋतू सुरु झाला कि रामगंगा
नदी मागे सरकायला लागते आणि ढिकालाचा गवताळ प्रदेश प्रकट होतो. एप्रिल
आणि मे मध्ये ढिकालात हत्ती ३०-६० च्या कळपांत दिसून येतात. ढिकाला उत्तराखंडच्या जिम
कॉर्बेट या राष्ट्रीय उद्यानातील सर्वात मोठा गवताळ प्रदेश आहे
वसंत
ऋतूच्या आगमनासह नवीन गवत वाढायला लागते,
रामगंगा नदी मागे सरकायला
लागली की ती ढिकाला चौरला प्रकट करते. ढिकाला चौर हा उत्तराखंडच्या
जिम कॉर्बेट या राष्ट्रीय उद्यानातील सर्वात मोठा गवताळ प्रदेश आहे. स्थानिक भाषेत
चौर म्हणजे गवताळ प्रदेश.
एक-दोन
जंगली वाघ बघण्यासाठी धडपडणाऱ्या निर्भय प्रवाशांना आणि वन्यजीवन जाणून घेण्यासाठी
उत्साही असणाऱ्यांना हे उद्यान एखाद्या लोहचुंबकाप्रमाणे आकर्षित करते.
प्रत्येक सिझनमध्ये कॉर्बेट उद्यानाला १,००,००० पेक्षा जास्त प्रवासी जरी भेट देत असले तरी त्यांपैकी फक्त काही हजारच
ढिकालाला जातात. जे उद्यानाच्या मुख्य द्वारापासून केवळ
एका तासाच्या अंतरावर आहे. याचे एक कारण म्हणजे ढिकालातील गेस्टहाउसेस ही मर्यादित
आणि साधारण आहेत आणि दुसरे कारण म्हणजे बऱ्याच जणांना याची मोहिनी माहीतच नाही.
एप्रिल
आणि मे महिन्यात येथील गवत सोनेरी
होते जे जंगलातील एशियन हत्तींना आकर्षित करते. कोणत्याही वेळी, ३०-६० च्या कळपांत, १०० च्या वर हत्ती या उंच
गवतातून सफारी करतांना पाहिले जाऊ शकतात. ते येथे मनसोक्त चरतात आणि आपापल्यात
तसेच इतर कळपांत मिसळतात. यासाठी ते अत्यंत हळू आवाजात गुरगुरतात(Low Frequency
Rumblings)-हे गुरगुरणे आवाजाच्या वेगापेक्षाही कमी
वेगाने जाणारे असते व ते जमिनीतून जाते.
|
मोठे हत्ती हे लहानग्यांच्या
सुरक्षेच्या बाबतीत
अत्यंत दक्ष असतात
|
मादी हत्ती आणि नर हत्ती यांचे सामाजिक जीवन हे अत्यंत
भिन्न स्वरूपाचे असते. मादी हत्तींणी या कुटुंबातील आई, मुली, बहिणी, मावश्या
इत्यादींनी घट्ट बांधलेल्या गटांत राहतात. या गटाचे नेतृत्व सर्वात वयस्क मादी किंवा सर्वात बलवान मादी करते.
|
मस्त असतांना नर हत्ती त्याच्या समोर येणाऱ्या कोणत्याही नराशी भांडतो
|
याविरुद्ध प्रौढ हत्ती हे बहुतेकदा एकाकी जीवन जगतात आणि आपला जास्तीत जास्त वेळ
आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भांडण्यात घालवतात. सर्वात प्रबळ नरच मादींशी समागम
करू शकतात. हत्तींच्या समागमाचा काही विशिष्ट कालावधी नसला तरी त्यंच्या मिलनाचे
दुर्मिळ दृश्य पाहण्यासाठी एप्रिल आणि मे हे सर्वात चांगले महिने आहेत कारण
मॉन्सून मध्ये जूनमध्य ते ऑक्टोबर पर्यंत ढिकाला बंद असते.
|
नर हत्ती जेव्हा 'मस्त' होतात तेव्हा त्यांच्या डोक्याच्या बाजूला असलेल्या ग्रंथीमधून एक जाड द्रव पदार्थ स्त्रवतो, याद्वारे ते ओळखले जाऊ शकतात |
नर हत्ती जेव्हा 'मस्त' होतात तेव्हा त्यांच्या डोक्याच्या बाजूला
असलेल्या ग्रंथीमधून डांबरासारखा द्रव पदार्थ स्त्रवतो. यावेळी असा हत्ती
त्याच्यासमोर येणाऱ्या कोणत्याही नराशी भांडतो आणि त्याचा जास्तीत जास्त वेळ मादी
कळपांच्या मागे पुढे घुटमळण्यात घालवतो. मोठे
हत्ती हे लहानग्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत अत्यंत सावध असतात. अगदी एखादा रोड
किंवा नदी ओलांडतांनाही लहानांना मोठे हत्ती आपल्या संरक्षणात नेतात. धोक्याची थोडीही जाणीव होताच
हत्तींचा कळप प्रवाशी वाहनांवरही धावून जातो.
|
धोक्याची जाणीव होताच हत्ती
प्रवाशी वाहनांवर धावून जातात
|
येथील आणखी एक प्रेक्षणीय दृश्य म्हणजे नदी किनाऱ्यावरील धुळीचे
स्नान. नदीत बुडी मारून वर आल्यानंतर हत्ती स्वतःच्या अंगावर संरक्षण कवच म्हणून
धूळ माखतात. ती सनस्क्रीन सारखे काम करते आणि लहान लहान किड्यांना दूर ठेवते.
|
मादी एशियन हत्तीणींना सहसा
सुळे नसतात आणि असलेच तर ते खूप लहान असतात |
गेल्यावेळी मी जेव्हा ढिकालाला गेलो
होतो तेव्हा एक मोठा सुळ्यावाला हत्ती सरळ माझ्या जीपकडेच यायला
लागला. ती नदीच्या जवळच उभी केलेली होती. तो इतक्या जवळ
होता की मला स्वस्थ राहणे कठीण झाले होते परंतु तरीही मी किंचितही हालचाल केली
नाही. थोडीशी हालचालही त्या हत्तीच्या आक्रमणाला निमंत्रण देऊ शकली असती. तो थोड्याशा
अंतरावर पाण्यातच थांबला आणि आपल्या अंगावर आपल्या सोंढीने पाण्याचे फवारे मारू लागला. एखाद्या जंगली सुळ्यावाल्या
हत्तीच्या एवढ्या जवळ मी कधीच आलेलो नव्हतो. मी इतका भारावून गेलो होतो कि त्याचा
फोटो काढायचेही मी विसरून गेलो. या महाकाय प्राण्यांना पाहायला
मिळणे म्हणजे एक अलभ्य लाभ आहे. मी जसे जसे दरवर्षी ढिकालाला जातो तशी तशी माझी आणखी पाहण्याची आणि शिकण्याची जिज्ञासा वाढतच चालली आहे.
===========================
First Published
In English: Mint,
In Marathi: Apala Paryavaran,
अनुवाद
परीक्षित सूर्यवंशी
suryavanshipd@gmail.com