शनिवार, १८ मार्च, २०१७

गब्बर - एक धैर्यशील योद्धा

डॉ. बिलाल हबीब/डॉ. पराग निगम
अनुवाद – परीक्षित सूर्यवंशी
त्याच्या जंगलातील दुसऱ्या एका वाघाला त्यानं ललाकारलं. त्या वाघाचं नाव होतं ‘जय’, म्हणून त्यांच्यातील लढाईनंतर, बॉलीवूडच्या कृपेनं याचं नाव पडलं गब्बर!

ग    ब्ब    र  

२०१०च्या शेवटापर्यंत, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (TATR) हा व्याघ्र संवर्धनातील एक मैलाचा दगड बनला होता. उत्तम संरक्षण, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि साथीला स्थानिकांचे सहकार्य यामुळे ताडोबा-अंधारी महाराष्ट्रातील एक सर्वोत्कृष्ट उद्यान म्हणून नावारूपाला आले होते. वाघांच्या संख्येतील वाढीमुळे पर्यटक आणि छायाचित्रकारांचा जणू पूर आला होता. या सगळ्यात वैज्ञानिकही मागे नव्हते.
आतापर्यंत या क्षेत्रातील वाघांच्या इकोलॉजीवर खूप कमी अभ्यास झाला होता यामुळे २०१२मध्ये महाराष्ट्र वन विभाग आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (नेशनल टायगर कन्झर्वेशन ऑथोरिटी) यांनी वाईल्डलाईफ इंस्टीट्यूट ऑफ इंडियाच्या सहकार्याने येथील वाघ आणि इतर सह-भक्षकांच्या दीर्घकालीन निरीक्षणासाठी एक प्रकल्प आखायचे ठरवले. या प्रकल्पाचे एक उद्दिष्ट वाघांची संख्या झपाट्याने वाढत असलेल्या या भूप्रदेशातील प्रौढ वाघांच्या हालचालींचे पेटर्न्स आणि ते जागेचा वापर कसा करतात यांचा अभ्यास करणे हे होते. या प्रकल्पांतर्गत ५ वाघांना रेडियो कॉलर लावण्याचे निश्चित झाले.
१७ ऑक्टोबर, २०१४ रोजी, ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात ‘छोटी तारा’ या वाघिणीला पहिली कॉलर लावण्यात आली. दोन दिवसांनी आम्ही – लेपर्ड फेस, शेरखान आणि गब्बर अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या एका वाघाला कॉलर लावली. त्याची वंशावळ म्हणजे एक गूढच होते. त्याच भागातील दुसऱ्या एका वाघाला त्याने ललकारले. त्या दुसऱ्या वाघाचे नाव ‘अमिताभ’ होते म्हणून त्यांच्यातील झडपेनंतर, बॉलीवूडच्या प्रभावामुळे आपोआपच याचे नाव गब्बर पडले. पर्यटकांच्या वाहनांबरोबर दूरपर्यंत चालत जाणारा हा वाघ चांगलाच धीट होता.
आम्हाला तो बऱ्याचदा ताडोबा तलावाच्या आसपास दिसत असला तरी अभयारण्याच्या बफरपर्यंत पसरलेले त्याचे क्षेत्र बरेच मोठे होते (जवळजवळ १२० – १४० चौ किमी. इतके) ज्यामुळे त्याचा माग ठेवणे जिकरीचे होत असे. एके दिवशी त्याला कॉलर लावण्यात आली. पर्यटकांनी त्याला चितळ रोडकडून ताडोबा तलावाजवळील ताडोबा रेंज ऑफिसकडे जातांना पाहिले. या टप्प्यावर त्याने आपला रस्ता बदलला आणि तो भावे बंधाऱ्याकडून वसंत बंधाऱ्याकडे जायला लागला. हे तेच ठिकाण आहे जेथे त्याला डार्ट मारण्यात आले. यानंतर तो काही अंतरावरील बांबूच्या झाडीत कुदून गेला. श्वास रोखून धरणाऱ्या काही मिनिटांच्या शोधानंतर शेवटी आम्हाला तो सापडला.  
प्रेमाचा बहर
२९ जानेवारी, २०१५ हा जंगलातील कामाचा एक असाच ‘नियमित’ दिवस होता. चिखलवाहित एक मोठा नर सांबर चिखलात लोळत असलेला आम्ही पहिला, तेथून पांढेरपौनीकडे परत येतांना आम्हाला पर्यटकांच्या जिप्सींचे एक टोळके दिसले जे ताडोबातील प्रसिद्ध वाघीण, मायाकडे आकर्षित झाले होते. उद्यान बंद होण्याची वेळ जवळ येत होती त्यामुळे बऱ्याचशा गाड्या या उद्यानाच्या बाहेर जायच्या रस्त्याला लागल्या होत्या.
यामुळे आम्हाला चितळ आणि पेटत्या पळसाच्या झाडांवर बसलेल्या काही वानरांच्या धोक्याची सूचना देणाऱ्या हाकांकडे लक्ष देऊन त्या वाघिणीचा माग घेण्यासाठी आवश्यक ती शांतता लाभली. अचानक धोक्याच्या सूचना येत होत्या त्याच्या थोड्याश्या विरुद्ध दिशेने ती गवतातून बाहेर आली, संध्याकाळच्या मंद प्रकाशात ती रुबाबदार वाघीण आणखीनच उठून दिसत होती. अक्खा दिवस जंगलात काबाडकष्ट केल्यानंतर मिळणारे असे काही क्षणच तुम्हाला विदर्भाच्या रणरणत्या उन्हात काम करत राहण्याचे सामर्थ्य देत असतात. त्या गवतातून ती सहजगतीने चालत आली आणि एका खुल्या जागेत विसावली. दरम्यान, पाणवठ्याजवळील झुडूपांतून धोक्याची सूचना देणारे आवाज येतच होते. त्याचवेळी गब्बरचे कुरणात आगमन झाले.

ग  ब्ब  र    आ णि    मा  या 

मायाला आठवडाभरापूर्वी इतर दोन वाघांबरोबर पाहण्यात आले होते. आम्हाला पक्की खात्री होती कि सध्या बहरात आहे. आम्ही त्यांच्याकडे डोळे लावून बसलो होतो, गब्बर तिच्याकडे गेला आणि तिनेही त्याच्या नाकाला आपले नाक घासून त्याचे स्वागत केले. त्यांचा फॉरप्ले डोळ्यांत साठवून ठेवावा असा होता. पाठलाग करणे, चुंबन घेणे, चावे घेणे, एकमेकांना प्रेमाने पंजे मारणे – हे सर्व भूतलावरील या महान प्राण्यांच्या प्रेमाराधनेतील सर्व विधी. त्यांना त्यांच्या प्रेमाच्या बहराचा आणि हक्काच्या एकांताचा मनसोक्त आनंद घेता यावा यासाठी, त्या ठिकाणी आणखी थोडावेळ शांततेत बसल्यानंतर आम्ही ती जागा सोडली.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पांढेरपौनीच्या कुरणात गेलो तेथे आम्हाला ती दोघे पुन्हा बरोबर त्याच ठिकाणी दिसली. गब्बर तिच्या बाजूला असा बसला होता जणू जगापासून तिचे संरक्षण करतो आहे. तो थोड्या-थोड्या वेळाने उठत होता, झाडांवर, बांबूच्या पुंजक्यावर आणि गवतावर मुत्राचे फवारे मारत होता, एकदा तर मयानेही असेच केले. पुन्हा एकदा, त्यांच्या वर्तनाच्या निरीक्षणांची नोंद घेऊन आम्ही तेथून पाय काढला.
शत्रुप्रेम
दोन दिवसांनी गब्बरला पाहायला आम्ही पांढेरपौनीला परत आलो, परंतु यावेळी माया कुठेच दिसली नाही. आम्ही त्याच्या मागेमागे जायला लागलो परंतु त्याने फायर लाईनच्या बाजूचा रस्ता धरला जेथे त्याच्या मागे जाणे आम्हाला शक्य नव्हते. बाजूलाच चिताळांचे जोरजोरात ओरडणे सुरु होते परंतु त्याचे तिकडे अजिबात लक्ष नव्हते.
रस्त्यावर पुढे तो दिसेल असा अंदाज बांधून आम्ही जवळच्या समांतर रस्त्यावर चालू लागलो. आमचा अंदाज बरोबर ठरला, आम्ही आनंदित झालो. पण हे काय? एक वाघ आमच्याकडे येत होता खरा पण तो गब्बर नव्हता! त्याच्या अंगावरील खुणांवरून तो काला आंबातील ‘घुसखोर’ वाघ असल्याचे समजत होते. आम्हाला आश्चर्य वाटले, ‘तो गब्बरच्या क्षेत्रात काय करतोय?’  
त्यानतंर जे झाले ते म्हणजे या क्षेत्रावर आपला हक्क सांगण्यासाठी झालेले एक अत्यंत मजेशीर द्वंदयुद्ध! त्या तरुण वाघाने जमिनीवर एका ठिकाणी नख्यांनी ओरखडे मारले आणि तो थोडा पुढे गेला. त्याच्या पाठीमागून येत असलेल्या आणि त्या घुसखोराप्रमाणेच नेमक्या त्याच ठिकाणी ओरखडे मारून मूत्राचा फवारा मारणाऱ्या गब्बरकडे तो मधूनमधून वळून पाहत होता.  
वाघांच्या एका प्राचीन रिवाजाचे साक्षीदार आम्ही बनलो होतो. तो तरुण वाघ रस्त्याच्या कडेला असलेल्या बांबूच्या आणि गरारीच्या (Cleistanthus) झाडांना जाणूनबुजून आपला वास लावत होता आणि नंतर गब्बर त्यांच्यावर पुन्हा आपला वास लावत होता. एका ठिकाणी तर गब्बरने त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या ओरखड्याशेजारी शी पण केली. आमच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची शारीरिक हिंसा न करता क्षेत्राच्या सीमेविषयीचा वाद मिटविण्याचा हा खूपच सभ्य मार्ग होता. परंतु यातील संदेश स्पष्ट होता. तरुण वाघाने शस्त्रे टाकली होती. हे सर्व पाहून चक्रावून गेलेलो आम्ही, आणखी काही अंतरापर्यंत त्यांच्या मागे गेल्यावर आमच्या छावणीत परतलो. वाघांच्या रहस्यमय जीवनाचे आणखी एक दर्शन मिळाल्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करत होतो.
४ फेब्रुवारी रोजी, ऐनबोडीकडे जातांना भरदिवसा, अगदी अनपेक्षितपणे आम्हाला गब्बरचे दर्शन झाले. तो आमच्याकडेच येत होता. दुसऱ्या वयाने लहान वाघाकडून आव्हान दिले गेल्यानंतर ४ दिवसांनी आम्ही त्याला पाहत होतो. परंतु त्याला पाहून झालेला आमचा आनंद क्षणभंगुर ठरला. त्याच्या तोंडातून रक्त पडत होते, त्याचा डावा गाल चेहऱ्यापासून खाली लोंबकळत होता, त्याच्या नाकाला खोल जखमा झाल्या होत्या. त्याचा एक डोळा जवळजवळ दिसत नव्हता. आम्ही विचारात पडलो, काही दिवसांपूर्वी आम्ही पाहिलेला क्षेत्रासाठीचा सभ्य संघर्ष पुढे एका जीवघेण्या लढाईत तर रुपांतरीत झाला नव्हता?
कुतूहलापोटी साधारण एक किलोमीटरपर्यंत आम्ही गब्बरच्या मागे-मागे गेलो, त्याने मोठ्या कष्टाने जमिनीवर आपल्या खुणा केल्या. आम्ही गब्बरला रेडियो कॉलर लावली होती आणि याठिकाणी, हे मान्य केले पाहिजे कि, त्याला तशा जखमी अवस्थेत पाहून आम्ही हादरून गेलो होतो. आधार वाटत होता तो एवढाच कि, आधी झालेल्या घटनांची माहिती असल्यामुळे गब्बर इतक्या गंभीररित्या जखमी कसा झाला याचा उलगडा आम्हाला होऊ शकत होता.
गब्बर रिटर्न्स
कार्यक्षेत्रावर काम करतांना आम्ही वन्यजीव शास्त्रज्ञांनी एक नियम आवर्जून पाळायचा असतो तो म्हणजे नैसर्गिक प्रक्रियांमध्ये ढवळाढवळ न करणे. आम्हाला माहित होते कि वयस्क आणि कमकुवताला त्याच्यापेक्षा तरुण आणि तंदुरुस्तासाठी जागा रिकामी करावीच लागेल. अर्थातच, गब्बरचा स्वतःचा तसा काही विचार नव्हता. जखमी झाल्यानंतर बराच काळ तो अभयारण्याच्या केंद्रातून एकदम गायब झाला. त्याच्या कॉलरमधील जीपीएसनुसार त्याचे ठिकाण हे बफरमध्ये असल्याचे दिसत होते जेथे काही वेळेस आम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नही केला, यात त्याचे प्रत्यक्ष दर्शन एकदाही होऊ शकले नाही पण कॉलरमधून येणाऱ्या शक्तिशाली सिग्नल्सवरून आम्ही त्याच्या उपस्थितीचा माग घेत राहिलो.

ग   ब्ब   र       रि   ट   र्न्स 

दोन आठवड्यांनी गब्बर पांढेरपौनी कुरणातील ताडोबा तलावाजवळ पुन्हा हजर झाला. सवयीप्रमाणे, तो पर्यटकांच्या वाहनांमधून नेहमीसारखाच बेफिकीरपणे चालत गेला. नाकावरील खोल जखमसोडून बाकी सगळ्या जखमा बऱ्यापैकी भरून येत असल्याचे दिसत होते. जंगलातील झाडाझुडूपांना तोंड (शब्दश:) द्यावे लागत असल्यामुळे ती जखम मात्र आणखी फाटली असावी. तो तलावाकडे जात असतांना आम्ही त्याच्या मागे गेलो, त्याने तलावात उडी मारली, पोहून एका छोट्याश्या बेटावर गेला आणि रात्र होईपर्यंत तेथेच थांबला. त्याच्या या कृतीचे आम्हाला आश्चर्य वाटले. त्या झटापटीनंतर गब्बर आम्हाला बऱ्याचदा या लहानश्या बेटावर बसलेला दिसला. त्याला कदाचित येथे जास्त सुरक्षित वाटत असावे किंवा येथे माश्यांचा त्रास कमी असावा. हळूहळू का असेना, तो बरा होत होता ही गोष्ट मात्र नक्की.
गब्बरच्या कॉलरमध्ये एक्टीव्हिटी सॅन्सर लावलेले होते ज्यामुळे प्रत्येक पाच मिनिटाला आम्ही त्याचा माग घेऊ शकत होतो. त्याने आपला ‘खास इलाका’ सोडला नव्हता पण त्याच्या वापराच्या आपल्या वेळा पूर्णपणे बदलल्या होत्या. जखमी होण्यापूर्वी तो ५.३० ते ९.३० आणि १६.३० ते २०.०० या काळात सर्वाधिक सक्रीय राहत असे. परंतु त्याला क्षतिग्रस्त करणाऱ्या लढाईनंतर त्याने आपली वेळ १०.०० ते १३.०० अशी केली होती. याच काळात त्या क्षेत्रावर आपला हक्क सांगण्यासाठी आक्रमक झालेल्या आणि वेगवेगळ्या जागी खुणा करत असलेल्या इतर वाघांशी संघर्ष टाळण्यासाठी त्याने असे केले असावे.  
गब्बर बरे होण्याची, आपली वेळ येण्याची वाट पाहत होता. त्याच्या कॉलरमध्ये लावलेल्या एक्टीव्हिटी सेन्सरमुळे आम्हाला त्याची रणनीती समजण्यास मोठी मदत झाली. परंतु त्याच्या अशा वागण्यामुळे बराच गोंधळ उडाला. आम्हाला तो कुठे आहे हे माहित असले तरी पर्यटक त्याला पाहू शकत नव्हते आणि यामुळे या काळात बऱ्याच काल्पनिक कथांनाही जन्म दिला गेला.  
त्याच्या जखमांच्या गांभिर्यावरून वादंग उभे राहिले आणि त्याच्या त्रासाचे कारण रेडियो कॉलर असल्याचे आधारहीन आरोपही झाले. एका कल्पनाविलासी तज्ञाने तर त्याच्या एका जखमेत अळ्या झाल्या असून त्या त्याचे मांस खात आहेत असा दावा केला. आम्ही यापैकी कोणत्याही वादात अडकलो नाही आणि कोणावर आरोपही केले नाहीत कारण मुळात हे सगळेजण त्याच वाघाबद्दल चिंता व्यक्त करत होते ज्याची आम्हालाही काळजी होती.
मार्चमधील एका संध्याकाळी गब्बरचा माग घेत असतांना तो पांढेरपौनी येथील पाणवठ्यावर असल्याचे समजले. येथील उंच गवतात त्याला पाहणे अवघड जात होते. आम्ही संध्याकाळपर्यंत वाट पाहिली. तो एक ढगाळलेला दिवस होता. सुरुवातीची रिमझिम आणि नंतर आलेल्या एका क्षणिक जोराच्या फटकाऱ्याने गब्बरला आपली जागा बदलण्यास प्रवृत्त केले. यावेळी पहिल्यांदाच आम्ही त्याची जखम व्यवस्थितरित्या पाहू शकलो. तो खरोखर खूप चांगल्याप्रकारे बरा होत होता. यावेळी घेतलेल्या स्पष्ट छायाचित्राने अळ्यांसंबंधीच्या अफवांना कायमचा विराम दिला.
वैज्ञानिक असल्यामुळे आम्ही तटस्थ असावे अशी अपेक्षा असते, परंतु आम्हीदेखील माणसेच आहोत. आम्हाला ज्याचे एवढे कौतुक वाटत होते तो वाघ बरा झाल्याचे पाहून आम्हीही मनातून आनंदलो होतो. गब्बरसोबत घालवलेली एक रम्य संध्याकाळ लवकरच संपणार होती कारण माया ताडोबा तालावाकडून पांढेरपौनीकडे येतांना दिसत होती. आश्चर्य म्हणजे, आपल्या वयस्क आणि जखमी प्रियकरासोबत तिने पूर्ण दोन दिवस घालवले. आताही ती त्याच्या नाकाला नाक लावत होती आणि अधूनमधून त्याच्या विरूप झालेल्या चेहऱ्यावर मैत्रीपूर्ण पंजे मारत होती.
येणाऱ्या काही दिवसांत गब्बरने त्या भागातील आपला दबदबा पुनर्प्रस्थापित केला. पुन्हा तो त्याच्या आवडत्या तलावात अंघोळ करतांना आणि त्याच्या काठावर पोहतांना दिसायला लागला. एखाद्या परीकथेचा वाटावा असा हा रम्य सुखांत आमच्या अभ्यासाला लाभला. हा वाघ सौंदर्य, सामर्थ्य, प्रेम, धैर्य आणि चिकाटीचे प्रतिक बनला होता. खर म्हणजे गब्बरने आम्हाला वाघांकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी दिली – वाघांची संख्या, त्यांच्या क्षेत्रांच्या हद्दी, क्षेत्रांचा ताबा, क्षेत्राच्या शोधात दुसरीकडे जाणे या सर्वांच्या पलीकडे जाऊन या बाबींतील बदलांमुळे वाघांच्या वर्तनात घडून येणाऱ्या बदलांकडे पाहण्याची दृष्टी! वाघांची इकोलॉजी अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी अभ्यासाचा एक चांगला आराखडा, प्रदीर्घ निरीक्षण आणि गब्बरने जी दाखवून दिली तशी प्रचंड इच्छाशक्ती आपल्याकडे असणे आवश्यक आहे.
गेल्यावर्षी, मार्च २०१६ मध्ये आम्ही गब्बरची रेडियो कॉलर काढली. ताडोबा तलावाजवळ तो खास गब्बर स्टाईलमध्ये पहुडलेला होता. आम्ही हा लेख लिहित असतांना आजही हा रफ अँड टफ वाघ ताडोबात येणाऱ्या पर्यटकांच्या दिल की धडकन बनलेला आहे आणि पुन्हा एकदा तो मायासोबत प्रियाराधन करतांना दिसतो आहे. त्याच्या सत्तेचा सर्वोच्च काळ आता लोटला असेल, त्याला आपला इलाका बदलावा लागला असेल परंतु तो आजही मैदानातून बाहेर पडलेला नाही.


हा लेख डॉ. बिलाल हबीब, डॉ. पराग निगम, जी. पी. गराड, विनय सिन्हा, ए.एस. कळसकर, जी.पी. नरवणे, पल्लवी घासकडबी, नीलांजन चटर्जी, मधुर दावते आणि अनिलकुमार दशहरे या सर्वांच्या सहकार्यातून लिहिला गेला आहे.  

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१७

Gloom on the Bloom

Prerna Agarwal
An Inlaks Ravi Sankaran fellow and TheRufford Foundation’s Small Grants recipient is a Pune based researcher. Since June 2012, she has been studying the impact of tourism on the vegetation of Kas plateau, a UNESCO natural World Heritage Site.
Photo credit– Neha Mujumdar
Here she shares her journey, the importance of the Kas plateau and how they are trying to save it. 

1. Prerna Agarwal, the Kas Woman! How did it all begin? Please share your journey with us. 

Around ten years ago, I visited Kas plateau for the first time. I was mesmerized by the carpets of wild flowers and that image of a pristine undisturbed Kas stayed in my memory. When I returned to Kas in 2008 as a Master’s student of Biodiversity studies, my image of a pristine Kas was shattered. There were as many people as flowers on the plateau, cars were parked on the flower beds, and visitors crushed hundreds of flowers under them to get that perfect photograph! This experience disturbed me deeply 
Impatiens lawii flowers
Kas is home to more than 350 flowering plant species, many of which are endemic and listed in‘the IUCN Red list of Threatened Species’. Every year thousands of visitors flock to Kas to witness such carpets of wild flowers.

Photo credit : Prerna Agarwal
While on a five month research fellowship at the University of Leeds I visited the Malham limestone pavement, a unique rocky habitat like Kas. I was amazed at the way tourism pressure was managed by allowing visitor traffic only on selected trails and extremely informative sign boards. Following this, I assisted Dr. Aparna Watve on a project on rocky plateaus, which gave me an opportunity to closely interact with the people working on plateaus in Maharashtra and understand the threats faced by each of the fifteen plateaus selected for the project. This experience exposed me to existing information gaps in rocky plateau conservation and formed the basis of my project on Kas and my journey began in 2012. 
Trampling effect
Trampling of vegetation by tourists is the biggest threat to Kas
Photo courtesy – Satara forest department
2. Why did you choose to work on Kas plateau? 

Plants found in extreme environmental conditions and their survival strategies have always fascinated me. Kas, a high altitude lateritic plateau, has a special ephemeral plant community. Plants here have adapted to complete their life cycle in five months of the monsoon, June-October, and lie dormant in the form of tubers, rhizomes and seeds for the rest of the year. During the dry months, the plateau appears to be ‘barren’ but it is a wrong notion. This is a very important time for the species as they are preparing themselves for the next monsoon. Hence, Kas was the perfect study site to cater to my research interests and an urge to conserve the biodiversity of this landscape. With time I started getting more interested in how these communities are responding to tourism pressure which forms the basis of my current work. However, it was the emotional connect I have with this place that initially pushed me to take up this work.

Different plants bloom during different times of the year, thus these rocky plateausare never barren!Euphorbia nana, for example, flowers in the peak of summer! 
Photo credit: Prerna Agarwal
3. What is a plateau? What are the unique features and importance of it? 

Flat areas on top of mountains are referred to as ‘high altitude plateaus’. In Maharashtra we find both high altitude and coastal plateaus which are either comprised of basalt or laterite. These plateaus can be viewed as terrestrial islands, disconnected from surrounding plateaus by valleys. Islands have many endemic species because they are geographically disconnected from the mainland and evolutionary processes lead to formation of unique biodiversity. Similarly, these terrestrial islands i.e. plateaus have many endemic plant and animal species. In addition, on each plateau, one can find different microhabitats defined by varied soil depth and water availability such as rock pools, soil covered areas, deep soil areas, rock surfaces. The unique geology, diversity of microhabitats and the resultant endemic biodiversity supported are the exceptional features of such rocky plateaus. They also serve many ecosystem services such as groundwater recharge and pollination. Hence, the so called ‘barren areas’ are in reality biodiversity hubs! 
Lateritic plateaus, popularly known as Sadas (सडा),are a characteristic feature of the northern Western Ghats and support highly specialized plant communities
Photo credit-Pratik Joshi
4. Tourism on Kas is constantly rising, why? 

‘It is an inevitable destiny: the very reasons why a property is chosen for inscription on the World Heritage List are also the reasons why millions of tourists flock to those sites year after year’ - Mr. Francesco Bandarin, UNESCO Paris.
During peak season, the number of tourists visiting Kas on weekendscantouch 50,000 per day, putting immense pressure on this habitat. A network of informal paths has been formed in the tourist zone. And traffic woes are beyond imagination
Photo credit (both photos)– Prerna Agarwal
This is true even for Kas. It was declared as a Natural World Heritage site because of its exceptional aesthetic and biodiversity value. The mass blooming phenomenon is the very reason why thousands of people visit the plateau every year in the monsoon. Sharing of picturesque flowering and landscape images on social media and wide coverage by the local media, blogs, and online articles have all played their role in making this fragile habitat popular. 

Kas fits the bill of a weekend get-away perfectly as it is just a couple of hours away from mega cities such as Mumbai, Pune and Kolhapur and is easily accessible. It is close to the popular hill station of Mahabaleshwar and visitor surveys have indicated that many combined their visit to Kas with Mahabaleshwar. Unless we have a proper outreach program in place, in my opinion, this issue of rising numbers will continue. 
During peak season, the number of tourists visiting Kas on weekendscantouch 50,000 per day, putting immense pressure on this habitat. A network of informal paths has been formed in the tourist zone. And traffic woes are beyond imagination
Photo credit (both photos)– Prerna Agarwal
5. You are studying the impact of tourism on Kas. How increased tourism is affecting this unique place and how are you working towards mitigating the ill effects of it? 

I am currently working as an independent researcher for the conservation of wild plants at Kas plateau through community participation. I have been studying the impact of human trampling, using both experimental and observational methods, on the herbaceous plant communities of the plateau since 2012. My results show clearly that the high levels of vegetation trampling on Kas are having adverse effects on the plant communities. I have been working closely with the Forest department and have given suggestions to regulate tourist movements by creating designated paths and reducing the visitor numbers, which is the biggest challenge at hand. 
Segregation of Solid waste done by members of JFMC and project volunteers
Tourist organizations have been experimentally roped in who help carry back the plastic waste collected, to their respective cities whenever they tour Kas. So far five organizations have volunteered to be part of this solid waste management model.
Photo credit– Rutwick Bardapurkar
Apart from the trampling study, developing a solid waste management model and conducting a two month long guide training program for the local people were other important aspects of the project. I am very happy to inform you that ten locals now conduct guided tours independently on the plateau. As far as the solid waste management goes, we have roped in tourist organizations as volunteers who carry back the waste collected by the JFMC, to their city whenever they bring a tour to Kas. This model has been working successfully since the past three years. 
Segregation of Solid waste done by members of JFMC and project volunteers 
Tourist organizations have been experimentally roped in who help carry back the plastic waste collected, to their respective cities whenever they tour Kas. So far five organizations have volunteered to be part of this solid waste management model. 
Photo credit– Rutwick Bardapurkar
6. Please share your most memorable experience while working in this field? 

I think the most memorable one was when I saw the local guides independently lead tours in 2015 for the first time after three years of rigorous training. I felt the entire team’s efforts were paid off when we received positive feedback from the visitors. Hearing the guides use scientific names fluently left the visitors and me awestruck! It was even more encouraging when the guides approached me towards the end of the season requesting more training, but now on butterflies and birds. 
Training local men as nature guides
Nature guides have played an important role towards regulating tourism. The guide ensures his group adheres to the marked trail and that no one litters on the plateau.
Working with the forest department has been a memorable experience in itself. They have supported my work and have taken initiatives to implement my suggestions. 
Receiving Certificate of Appreciation from Shri Praveen Singh Pardeshi, then Principal secretary of Maharashtra Forest dept, CCF (Kolhapur Territorial) M.K. Rao and then DCF Satara,Territorial) N.R. Praveen
Photo courtesy – Prerna Agarwal
7. As a woman, did you face any hurdles to move into this field? 

I feel the research environment today in our country is much more receptive to women field biologists than what it was a few decades ago. I was fortunate to be guided by the right people at every step, and have the unconditional support from my family. At Kas, both the Joint Forest Management Committee (JFMC) members and the Forest department were always eager to help. It was around 6 pm on a rainy day and I was still monitoring my vegetation plots when I got a call on my mobile phone from Ashok, a JFMC member, someone had deflated my vehicle tyres parked a kilometer away from the plateau. I, along with my two volunteers, rushed to the site, and I was deeply touched to find all of the samiti members waiting for me. Since it was almost dark by this time, they insisted that we stay in the village for the night and helped me repair my vehicle the next day. This, and many such incidents have etched a strong sense of belonging in my heart to the people of Kas. 


8. Any message for our readers? 

Kas is not just another tourist spot, but a region of irreplaceable biodiversity value and a heritage site. It should be viewed more as an education place than a recreation destination. There is much more to learn from this natural wonder rather than just visiting to click selfies and sharing them online. 

Often, visitors complain- ‘the flowers are miniscule; we were expecting larger flowers shown in images online’. Unfortunately, the images seen online are macro-shots of flowers. In reality, the flowers here are really tiny- sometimes the entire plant is just your thumb size. We have received suggestions like ‘The forest department should add more manure’ or ‘managers should remove all the plants and put tulips’. Visitors often forget that Kas is a ‘natural habitat’ and needs to be conserved in its original form. Each plant is a treasure of thousands of years of evolution. 

Kas, is our own natural heritage. It may sound clichéd, but the future of this World heritage site lies in our hands. Let us strive towards transforming ourselves from being just ‘tourists’ to ‘conscious travelers’. 
Such awareness boards form a part of the open interpretation centre on Kas, which was started in 2014.
Photo credit- Prerna Agarwal
-Parikshit Suryavanshi 

@@@@ 

सोमवार, ९ जानेवारी, २०१७

वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणाचे सोपे उपाय

- विराट सिंग अनुवाद – परीक्षित सूर्यवंशी

 
२००२ साली कर्नाटकातून सात हत्ती सिंधुदुर्गमध्ये आले आणि तिथंच स्थायिक झाले! आतापर्यंत महाराष्ट्र वन विभागाला  हत्तींच्या समस्येला कधीच तोंड द्यावे लागले नव्हते आणि स्थानिकांसाठी तर हे अगदीच अनपेक्षित (आणि अवांछितही!) अतिथी होते. यामुळे लवकरच मानव-हत्ती संघर्षाला सुरुवात झाली. अनेक राज्यांनी या समस्येवर उपाय म्हणून बरेच “इंजिनिअरींग सोल्युशन्स” वापरून पाहिले परंतु त्यांचा उपयोग झाला नाही. आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात वन्यजीव शास्त्रज्ञ, वन विभाग आणि शेतकरी एकत्र आले आहेत. त्यांनी कम्युनिटी बेस्ड अप्रॉचवर (स्थानिक लोकांना बरोबर घेऊन समस्येवर उपाययोजना करण्याची पद्धत) भर देण्याचे ठरवले आहे. त्यांचे हे प्रयत्न यशस्वीही होत आहेत.  
कर्नाटकच्या हलियाल गावाचे शेतकरी नंदेश पाटील काहीतरी करण्यात गढून गेलेले दिसताहेत. लाल मिरच्या, तंबाखू आणि इतर काही घटक एकत्रित मिसळून ते एक मिश्रण तयार काराहेत. याचे काय करणार असे विचारल्यावर ते म्हणाले, हे मिश्रण पेपरमध्ये गुंडाळून त्याची एक लांब मोळी केली जाईल. मग तीच्यातून धूर निघेल इतपतच आग तिला लावली जाईल. शिंकत आणि खोकत, पाटील पुढे अभिमानाने म्हणाले, या चुडीने त्यांच्या शेतातून हत्तींना पळवून लावण्यात त्यांची मोठी मदत केली आहे.
४६ वर्षीय पाटील यांच्याकडे क्यातन्गेरा (Kyatangera) गावात १० एकर जमीन आहे ज्यावर ते ऊस आणि भाताची शेती करतात. आपल्या वार्षिक स्थलांतरा दरम्यान हत्तींना या पिकांवर ताव मारायला खूप आवडते. हत्तींपासून आपल्या पिकाच्या संरक्षणासाठी पाटील यांनी केलेल्या अशा उपायांकडे आता कम्युनिटी बेस्ड कॉन्फ्लीक्ट मेनेजमेंट अथवा सीबीसीएम (लोकसमूहाधारित संघर्ष व्यवस्थापन) मॉडेलची एक यशोगाथा म्हणून पाहिले जाते. वाईल्डलाईफ रिसर्च अँड कन्झर्वेशन सोसायटीद्वारे (WRCS) हे मॉडेल सध्या उत्तर कन्नड भागात राबविले जात आहे.
स्थानिकांशी संवाद आणि त्यांचा सहभाग
WRCS २०११ पासून उत्तर कन्नड भागात हत्तींकडून होणारे नुकसान कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना पीक संरक्षणासाठी कमी खर्चाच्या आणि सोप्या उपायांचे प्रशिक्षण देत आहे आणि  या पद्धतीचे सकारात्मक परिणामही आता दिसायला लागले आहेत अशी माहिती वन्यजीव शास्त्रज्ञ आणि WRCSच्या कार्यकारी संचालक, डॉ.प्राची मेहता यांनी दिली.
डॉ.प्राची मेहता, वन्यजीव शास्त्रज्ञ आणि WRCSच्या कार्यकारी संचालक
महाराष्ट्र आणि त्यासारख्या इतर राज्यांनी हत्ती रोधक खंदके (एलिफंट प्रुफ ट्रेन्चेस), सौरशक्तीभारीत कुंपणे (सोलार पावर्ड फेन्सेस) यांसारखी ‘इंजिनिअरींग सोल्युशन्स’ वापरून पाहिली परंतु ती अगदीच कुचकामी ठरली. वन विभागाने हे समजून घेतले पाहिजे कि येथे त्यांना पाच किलोचा मेंदू असलेल्या एका अत्यंत बुद्धिमान प्राण्याचा सामना करायचा आहे. यामुळे त्यांनी आपल्या दृष्टीकोनात बदल करावा आणि आपल्या प्रयत्नांत स्थानिक लोकांना सामावून घ्यावे यावर आम्ही भर देत आहोत.
सीबीसीएम पद्धत आफ्रिकेत व्यापक प्रमाणावर राबविली गेली आणि तेथे तिला मोठे यशही मिळाले आहे असेही मेहता सांगतात.  
WRCSच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे कि या अडथळ्यांनी (इपीएफ, एसपीएफ इत्यादी) आपली परिणामकारकता दुसऱ्याच वर्षी गमावली होती. याबाबतच पुढे बोलतांना मेहता म्हणाल्या, “देशभरात असे उपाय अयशस्वी होत असतांनाच, प्राण्यांना पकडा आणि काढा किंवा पकडा आणि दुसरीकडे नेऊन सोडा हा पुढचा उपाय सुचवण्यात आला. जीवशास्त्रज्ञांच्या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे कि या पद्धती अवैज्ञानिक तर आहेतच परंतु त्याचबरोबर त्या अयशस्वीही आहेत.” परंतु मेहता यांना याहीपेक्षा मोठ्या चिंतेची बाब वाटते ती ही कि काही राज्यांनी हत्तींना व्हर्मिन (अपायकारक कीटक/प्राणी) घोषित केले जावे आणि त्यांचा “नायनाट” केला जावा अशी मागणी केली आहे.   
त्यांच्या मते, सिंचन सुविधांमध्ये झालेल्या सुधारणांमुळे ऊस आणि भात या पिकांखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून जंगलांवर अतिक्रमण होत आहे आणि या बाबींचा एकंदर कल पाहता भविष्यात उत्तर कन्नडमध्ये मनुष्य-हत्ती संघर्षात वाढ होईल असेच दिसते.
“हत्ती आणि माणसांना जर एकत्र राहायचे असेल तर एकमेकांची उपस्थिती आणि क्रियाकलापांचे दुष्परिणाम कमीतकमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही सीबीसीएम ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. जी स्थानिक लोकांना हत्तींपासून होणारे पिकांचे नुकसान कमी करण्यास आणि परिणामकारक संरक्षण पद्धती उभारण्यास सक्षम करते.” मेहता सांगतात. सीबीसीएम मॉडेल अजूनही भारतात लोकप्रिय झालेले नाही हे मान्य करतांनाच त्या हे ही सांगतात कि या प्रकल्पाच्या माध्यमातून अल्प खर्चाच्या आणि सोप्या उपायांनी पिकांचे संरक्षण कसे करता येते याची उदाहरणेही ते स्थानिक लोकांसमोर ठेवत आहेत.
“हत्तींना शेतात घुसण्यापासून परावृत्त करण्यासाठी रात्रीचा पहारा, दारावरची घंटी, मिरचीचा धूर यांसारख्या प्रतिबंधक उपायांचा वापर केला जातो. एवढे करूनही जर ते घुसलेच तर परिणामकारक अशा विकर्षक (रीपेलंट) उपायांद्वारे त्यांना पळवून लावले जाते.” मेहता पुढे म्हणतात, परंतु हे उपायही परिपूर्ण नाहीत आणि यातही एकापेक्षा जास्त उपायांचा मेळ घालून वापर करणे आवश्यक ठरते कारण हत्ती शीघ्रशिके (पटकन शिकणारे) असतात. असे असले तरी या पद्धतींचा वापर करणारे शेतकरी आपले ७५% पिक वाचवण्यात यशस्वी ठरले आहेत.
सीबीसीएम पद्धतींच्या फायद्यांकडे पाहतांनाच तिच्यासमोरील आव्हानांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही याकडे लक्ष वेधत मेहता म्हणाल्या, “शेतकऱ्यांचा या पद्धतीवर सहजासहजी विश्वास बसत नाही. खरतरं, २०११ मध्ये जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्हला शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. शेतकरी आमची आणि आमच्या कल्पनांची टिंगल करीत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना या समस्येवर त्वरित समाधान हवे असते आणि शासनाने किंवा वन विभागाने ती निरसावी अशी त्यांची अपेक्षा असते.”
साधने : दारावरची घंटी, मिरची आणि फटाके
क्यातेन्गेराचे पाटील काही प्रमाणात नासधूस झालेल्या आपल्या ऊसाच्या पिकाचे २०१५ मधील एक छायाचित्र दाखवत, हसत सांगतात, कि त्यांनी फक्त फटाके आणि मिरचीचा धूर वापरून आपले ७०% पिक वाचवले.  
पाटील यांच्यासारख्याच येल्लापुर आणि हलियाल फॉरेस्ट डिव्हिजन मधील १२ गावातील ५०० शेतकऱ्यांच्या शेतातही अगदी ऑगस्टपासून फेब्रुवारीपर्यंत हत्ती घुसखोरी करतात. या सर्वांनी मिळून एक पिक संरक्षण समिती स्थापन केली आहे. WRCS त्यांना आपल्या पिकाचे संरक्षण करण्यास प्रोत्साहित करते आणि दारावरची बेलवापरून ट्रीप अलार्म बनवणे, मिरचीचे मिश्रण, फटाके आणि फिरते आगीचे गोळे बनवून वापरण्याचे प्रशिक्षणही देते.
क्यातेन्गेराच्या गावकऱ्यांना हत्तींचा कळप येत असल्याची माहिती १०-१५ दिवसांपूर्वीच वनविभागाकडून दिली जाते. माहिती मिळताच पिक संरक्षण समिती सक्रीय होते आणि आधीच ठरल्याप्रमाणे कामांना सुरुवात करते. तिचे पहिले काम रात्रीच्या वेळी हत्तींवर नजर ठेवण्यासाठी शेतांच्या आसपास झाडांवर मचाण उभारणे हे असते.
सीबीसीएमसाठीचे WRCSचे प्रकल्प अधिकारी रवी येल्लापुर यांनी ही पूर्वसूचना पद्धत समजावून सांगितली. हत्ती सहसा रात्रीच्यावेळी शेतात घुसतात म्हणून मग अनेक प्रयोगांती त्यांनी शेतकऱ्यांना अलार्म बेल बसवण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. यात “एका नायलॉनच्या दोरीला बाजारात मिळणारी, बेटरीवर चालणारी एक साधी दारावरची घंटी जोडली जाते आणि संपूर्ण शेताला या दोरीचे कुंपण घातले जाते. हत्तींनी शेतात घुसण्याचा प्रयत्न केला कि दोरी ओढली जाऊन लगेच घंटी मोठ्या आवाजात वाजायला लागते. यामुळे हत्ती गोंधळून जातात आणि शेतकरीही सावध होतात.” 
शेतकऱ्यांच्या आवडीची आणखी एक पद्धत म्हणजे मिरचीयुक्त दोरी! हत्तींना तयार किंवा कापणी केलेल्या पिकांचा वास येतो. त्यांना पिकापासून दूर ठेवण्यासाठी शेतकरी हिरवी मिरची आणि तंबाखू यांच्या लगद्यात भिजवलेली दोरी पिकाच्या चोहीकडून गुंडाळतात.
एक शेतकरी म्हणतो, “आम्ही मिरचीचे धुडकेही बनवतो. मिरची आणि तंबाखूच्या याच लगद्यात थोडे खराब इंजिन ऑईल कालवून ते कापडावर लावले जाते. असे कापडाचे तुकडे शेताच्या कुंपणावर लावले जातात. हत्तींना या वासाचा फारच तिटकारा आहे आणि यामुळे पिकाचा वासही दाबला जातो.”

एवढे करूनही हत्ती शेतात घुसलेच तर शेतकरी मिरचीपासूनच बनवलेल्या अनेक प्रतिबंधकांचा वापर करतात जे त्यांनी हत्ती येण्याआधी महिन्याभरापूर्वीच बनवून ठेवलेले असतात. पाटील यांनी यातलाच आणखी एक प्रकार सांगितला, “लाल मिरच्या, तंबाखू आणि नारळाच्या शेंड्या गवत आणि पेपरात गुंडाळून सधारण १० फुट लांबीची एक “चुडी” तयार केली जाते जी हळूहळू जळण्यासाठी शेताच्या कुंपणावर लटकावून ठेवतात. तिच्यातून निघणारा मिरची आणि तंबाखूयुक्त झणझणीत वास हत्तींना अगदी जेरीस आणतो.”
प्रशिक्षित शेतकरी हत्तींना घाबरवण्यासाठी गलोलीतून त्यांच्या दिशेने मोठ्या आवाजाचे फटाके फेकण्याचा प्रयोगही करतात. मात्र, यावेळी कोणत्याही हत्तीच्या अंगावर फटाका पडणार नाही याची काळजी घेतली जाते. आणखी एक युक्ती म्हणजे फिरता आगीचा गोळा. चिंध्यांपासून बनवलेला एक कापडी गोळा केरोसीनमध्ये बुडवून एका लांब साखळीला बांधला जातो. मग या गोळ्याला आग लावून तो गोल गोल फिरवला जातो. फिरतांना तो सूंsss सूंsss असा आवाज करतो ज्यामुळे हत्ती पळून जातात असे येल्लापुर यांनी सांगितले. त्यांनी आपल्या वन विभागातील कर्मचाऱ्यांनाही हा गोळा फिरवण्याचे प्रशिक्षण दिले आहे.
येल्लापुर यांनी शेतकऱ्यांना या पद्धती शिकवण्यासाठी आम्ही बराच वेळ देत असल्याचे आणि त्यांच्या नुकसानीत झालेली घट पाहून त्यांचाही या मॉडेलवर विश्वास बसला असल्याचे सांगितले. त्यांनीच पुढे यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील कमी खाणाऱ्या आणि जास्त नासधूस करणाऱ्या या “सभ्य दिग्गजांबद्दलची” शत्रुत्वाची भावना कमी झाली असल्याचेही नमूद केले.
असे असले तरी, WRCSचे सदस्य मान्य करतात कि सीबीसीएम मॉडेलही काही १००% खात्रीचा रामबाण उपाय नाही. हत्तींना पळवून लावण्यासाठी एकच उपाय वारंवार करता येत नाही कारण त्यांनाही त्याची सवय होते आणि मग ते त्याला भिक घालेनासे होतात. यावर वन्यजीव शास्त्रज्ञ आणि WRCSच्या कार्यकारी संचालक डॉ. प्राची मेहता यांनी “हत्तींना आश्चर्याचा धक्का बसत राहणे आवश्यक असल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना या उपायांचा चाणाक्षपणे वापर करण्याचे आणि वेगवेगळ्या उपायांचे मिश्रण करण्याचे प्रशिक्षण देत आहोत.” असे सांगितले.
मधमाश्यांचे सुरक्षाकवच
भूतलावरील सगळ्यात मोठा प्राणी लहानश्या माशीला घाबरतो हे पाहून उत्तर कन्नडमधील शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या चोहीकडून मधमाश्यांचे पोळे लावायला सुरुवात केली आहे. WRCSही यावर प्रगोग करत आहे. सुरुवातीच्या थोड्या यशाने हुरूप वाढल्याने आता मातीचे भांडे, बांबू आणि लाकडाच्या ओंडक्यांत कमी खर्चाचे मधमाश्याचे पोळे बनवणायचे प्रयत्न सुरु आहेत. जे या अगडबंबांना शेतापासून दूर ठेवतीलच सोबतच शेतकऱ्यांना मधापासून आर्थिक लाभही मिळवून देतील.
केनियातील सेव्ह द एलिफंट (एसटीई) आणि एलिफंट अँड बीझ प्रकल्पाच्या प्रमुख डॉ.ल्युसी किंग यांच्याशी २००९ मध्ये झालेल्या भेटीने डॉ. प्राची मेहता यांना या कामाची प्रेरणा दिली. याचबरोबर डॉ. किंग यांनी त्यांना भारतात प्रयोगासाठी मधमाश्यांचा आवाज असलेल्या ऑडियो क्लिप्सही दिल्या.
कर्नाटकात आल्यावर शिमोगा येथील शिबिरात मेहता यांनी मधमाश्यांच्या गणगणाटाचा हत्तींवर काय परिणाम होतो याची चाचणी घ्यायला सुरुवात केली. यात त्यांना हत्ती खरंच या आवाजाला घाबरत असल्याचे दिसून आले. “जंगली हत्तींच्या कळपावर याचा काय परिणाम होतो हेही आम्हाला पाहायचे होते म्हणून आम्ही एका शेतात घुसलेल्या जंगली हत्तींच्या कळपावर हा प्रयोग केला. हा आवाज ऐकल्याबरोबर ते पळून गेले. हे पाहून आम्हालाही आश्चर्य वाटले. परंतु या अत्यंत चाणाक्ष प्राण्याला हा आवाज म्हणजे नुसतीच पोकळ धमकी असल्याचे लवकरच कळणार हेही आम्हाला जाणवलं म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी मधमाश्यांच्या पोळ्यांचे कुंपण आपल्या शेताला घालावे यासाठी त्यांना प्रेरित करायला सुरुवात केली.”
मधमाश्यांच्या पोळ्यांचे कुंपण
एक सारख्या अंतरावर मधमाश्यांचे (इंडिअन हनी बी) पोळे शेताच्या परीघावर लावले जातात. त्यांना एका दोरीने जोडलेले असते. “हत्तींनी शेतात प्रेवेश करण्याचा प्रयत्न केला कि पोळे हलतात आणि त्यातून मधमाश्यांच्या झुंडी बाहेर पडतात आणि हत्ती घाबरून पळ काढतात.” मेहता यांनी सांगितले.
लाकडाचे ओंडके आणि मातीच्या भाड्यांत मधमाश्यांचे पोळे लवकर कसे तयार होईल यासाठी WRCS मधुमक्षिका पालकांशीही संवाद साधत आहे. “आमच्या या उपक्रमाला यश मिळत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रियाही आमचा उत्साह वाढवत आहेत. परंतु काळजी एवढीच आहे मधमाश्यांचे पोळे अस्वलांना तसेच चोरांनाही आकर्षित करू शकते म्हणून त्यांच्याकडे कोणाचे फारसे लक्ष जाणार नाही अशा पद्धतीने ते बनवणे आवश्यक आहे.”
महा वनरक्षकांचा कार्यशाळेत सहभाग
कोल्हापूर डिव्हिजनच्या “हत्तींचा उपद्रव” असलेल्या आजरा रेंजमध्ये सेवा देत असलेले आणि महाराष्ट्र वन विभागात वर्षभरापूर्वीच भरती झालेले वन रक्षक सुनील कुरी यांना आपल्या खात्यातील सहकाऱ्यांनाच नव्हे तर शेतकऱ्यांनाही या महाकाय परंतु सभ्य अशा प्राण्यांना दूर ठेवण्यासाठी कमी खर्चाचे उपाय आहेत हे पटवून द्यायचे आहे.
WRCSने कर्नाटकातील काली व्याघ्र अभयारण्यात घेतलेल्या कार्यशाळेत कोल्हापूर तसेच सावंतवाडीच्या इतर आठ वन रक्षकांबरोबर कुरी हे सुद्धा सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनी हत्तींना शेतांपासुन दूर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पनांवर विचारविनिमय केला. याचबरोबर विविध प्रतिबंधकांच्या चागंल्या वाईट परिणामांवरही चर्चा झाली.
“माझी पहिलीच पोस्टिंग अशा ठिकाणी आहे जिथे मोठ्या प्रमाणावर मानव-हत्ती संघर्ष आहे. या कार्यशाळेने मला हत्तींच्या बायोलॉजीबरोबरच स्थानिक लोकांना सहभागी करून साधे परंतु परिणामकारक उपाय कसे योजता येतील हेही समजावून सांगितले.
वन रक्षक चंद्रकांत पावसकर गेल्या १३ वर्षांपासून महाराष्ट्र वन विभागात काम करत आहेत. यातील ७ वर्ष त्यांनी चंदगढ सारख्या खूप जास्त मानव-हत्ती संघर्ष असलेल्या क्षेत्रात घालवली आहेत. मिरचीच्या धुरासारखे काही कमी खर्चाचे उपाय ते वापरत असल्याचे त्यांनी सांगितले परंतु खरी समस्या ही स्थानिकांकडून मिळणाऱ्या सहकार्याचा अभाव ही आहे. “सर्वकाही वन विभागानेच करावे अशी लोकांची अपेक्षा असते” असे ते म्हणाले.  
याचवेळी मेहता एक सावधगिरीचा इशारा देतात. “गेल्या काही वर्षांत दोडामार्ग आणि सावंतवाडीच्या काही शेतकऱ्यांनी खाजगी जंगलातील आपल्या जमिनी केरळ आणि तामिळनाडूतील लोकांना कवडीमोल भावाने विकून टाकल्या आहेत. या मोठ्या प्रमाणावर लागवड करणाऱ्या लोकांनी आता जंगले साफ करून त्याठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर ऑईल पाल्म, रबर, नारळ आणि केळीची लागवड करायला सुरुवात केली आहे. जमिनीचा असा वापर टाळला पाहिजे”
“आम्हाला आशा आहे कि महाराष्ट्र वन विभाग हलियाल आणि येल्लापुर सारख्या गावात होत असलेल्या कामापासून प्रेरणा घेईल. त्याठिकाणी यांच्या तुलनेने खूप जास्त संघर्ष आहे तरीही तेथे स्थानिक लोकांच्या सोबतीने काम केले जात आहे.” पुढे मेहता हे सीबीसीएम मॉडेल महाराष्ट्रातीलही अनेक गावांमध्ये सहज राबविले जाऊ शकते असेही म्हणाल्या.  

@@@@@@

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६

मेळावर आली कारवी!


पियुष सक्सेरिया, अनुवाद – परीक्षित सूर्यवंशी

लहानपणी बहरलेल्या कारवीतून वाट काढत एक टेकडी चढत गेल्याचं मला अंधुकस आठवतं. पण कितीही आठवण्याचा प्रयत्न केला तरी कारवीच्या फुलांनी आच्छादलेला एखादा डोंगर माझ्या डोळ्यापुढे उभा राहत नाही कि तिचं एखाद फुल अलगद उचलून मी आपल्या वहीत जपून ठेवल्याचंही मला आठवत नाही. कारवीची झालर पांघरलेला एखादा डोंगर पाहणे ही आयुष्यभरासाठी एक अविस्मरणीय आठवण ठरू शकली असती कदाचित. लहानपणी अज्ञानामुळे ती संधी गेली. पण आता पुन्हा एकदा ती मला खुणावत होती आणि यावेळीही तोच मूर्खपणा करणे परवडण्यासारखे नव्हते. मी लगेच पश्चिम घाटातलं पाचगणी गाठलं. येथे या भागातील पहिल्याच कारवी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. कारवी या विलक्षण वनस्पतीच्या बहरण्याचा सोहळा साजरा करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला जातो.  याची देही याची डोळा मलाही तो सोहळा अनुभवयाचा होता. 
 एखाद्या खुरट्या वृक्षासारखी दिसणारी कारवी (Strobilanthes callosa) ही Strobilanthes या वनस्पतीप्रकारातील एक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आहे. पश्चिम घाटाच्या डोंगरउतारांवरील बरड मातीत जिथं अगदी मोजक्या वनस्पती कशाबशा उगवतात तेथे कारवी भरभरून येते. पावसाळ्यात तिला पालवी फुटते, पुढे या पालवीचे हिरव्यागार मऊ व खरबरीत पानांमध्ये रुपांतर होते. हिवाळ्यात ही पानं गळायला लागतात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला झाड पूर्णपणे वाळल्यासारखं दिसू लागतं. हे चक्र सात वर्ष असंच चालतं. आठव्या वर्षी कारवी आधी कळ्यांनी आणि मग निळसर जांभळ्या फुलांनी बहरून जाते. याबरोबरच हे निरस वाटणारे डोंगरउतार या सुंदर जांभळाईने जणू प्रज्वलित होऊन जातात. संपूर्ण कारवीतून मधमाश्या गुणगुणू लागतात. त्या नुसते मधच गोळा करत नाहीत तर तिचे परागकण वाहण्याचे कामही करतात. कारवीच्या अशा एकत्रित बहरण्यालामुळेच कदाचित स्थानिक लोक या घटनेला कारवी “मेळावर” आली असं म्हणतात. पुढे तीन-चार महिन्यात कारवीला फळे येणे, पिकणे आणि जमिनीवर पडून वाळणे या सर्व गोष्टी नैसर्गिकरीत्या घडून येतात आणि जवळपास जानेवारीच्या सुमारास सर्वच्या सर्व कारवीची झाडे मरून जातात.
कारवीच्या बीज प्रसाराची पद्धतही विलक्षणच आहे. वनस्पती शास्त्रज्ञ अपर्णा वाटवे यांनी ती समजावून सांगितली, कारवीच्या बियांचा प्रसार अद्रतास्फोटातून होतो. कारवीची वाळलेली फळे बराच काळ ओलसर वातावरणात राहिल्यास ती फुटून त्यातून बिया जोरात बाहेर फेकल्या जातात. या बिया आपल्या मूळ झाडापासून ५ मीटर दूर पर्यंत जाऊन पडतात आणि पावसाळ्यात उगवतात. हा घटनाक्रम Strobilanthes या वनस्पतीप्रकारचं वैशिष्ट्य आहे. भारतात या प्रकारातल्या ५६ वनस्पती आढळून येतात.
याच वर्षी, याप्रकारातील उत्तर पश्चिम घाटाच्या पठारांवर येणारी आणखी एक वनस्पती, टोपली कारवीही फुलली आहे. उलट्या ठेवलेल्या टोपलीसारखी दिसते म्हणून तिला मराठीत हे नाव पडलं. टोपली कारवीच्या बीजापासून फुलं येण्यापर्यंतच्या कालक्रमाबद्दल तज्ञांची वेगवेगळी मते आहेत. अंबोलीचे निसर्गप्रेमी महादेव भिसे याबद्दल सांगतांना म्हणाले कि, “स्थानिक लोक टोपली कारवीला अकरा म्हणतात कारण ११ हा तिला फुलोरा येण्याचा कालावधी दर्शवतो. हिलाच बकरा असंही म्हटलं जात कारण तिचं झाड खाली डोकं घालून चरत असलेल्या बकरीसारख दिसतं.”
याच वर्षी या दोन कारवींच फुलून येण जणू पुरेसं नव्हत म्हणून दक्षिणेत आढळून येणारी आणि १२ वर्षांनी फुलणारी प्रसिद्ध निलकुरुंजीही यांच्या जोडीला मोहरून आली आहे. तामिळनाडू आणि केरळ मध्ये पसरलेल्या निलगिरी पर्वतरांगांवर ती फुलली आहे. आपल्या निळसर पांढऱ्या फुलांनी संपूर्ण डोंगर व्यापून टाकणाऱ्या या फुलांमुळेच या पर्वताला निलीगिरी हे नाव पडलं अस म्हणतात.
कारवी/कुरुंजीचं झाड आणि तिच्या बहरण्याचा हा अनुपम सोहळा तिथल्या मूळ जमातींच्या जीवनात मोत्यातील धाग्याप्रमाणे गुंफलेला आहे. मुन्नारचे मुथुवान आणि निलगिरीचे टोडा लोक कुरुंजीच्या फुलोऱ्याला मांगल्याचं प्रतिक मानतात. फुलं येऊन गेल्यानंतर पुन्हा बी अंकुरेपर्यंत वाळलेलं झाड तोडणं स्थानिक रूढीनुसार अमंगल मानलं जात. मुथुवान लोक कुरुंजीच्या बहरण्यानं आपलं वय मोजतात आणि कुरुंजीला प्रेम आणि प्रणयाचं प्रतिक मानतात.
कारवी ही जशी लोकप्रिय आहे तशीच ती प्राणीप्रियही आहे. याबद्दल माहिती देतांना पाचगणीचे ट्रेकिंग गाईड नामदेव यांनी सांगितले कि तिच्या खरबरीत पानांनी आणि खोडाने आपले अंग खाजवून घेण्यासाठी गवे दाट कारवीतून चालत जातात. कणकवली कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक आणि वनस्पतीशास्त्रज्ञ बाळकृष्ण गावडे यांनी गवे आणि हरणांना कारवीची पाने तर अस्वलांना फळे खायला आवडतात असे सांगितले. कोट्टागिरी येथील कि स्टोन फाउंडेशनच्या वनस्पतीशास्त्रज्ञ अनिता वर्गीस यांनी बहराच्या काळात मधमाश्या बारा वर्षांतून एकदाच तयार होणारं, बहुमोल अस एकलपुष्पी (युनिफ्लॉरल) कुरुंजी मध तयार करतात अशी माहिती दिली.
नाशिकच्या पर्यावरण अभ्यासक जुई पेठे यांनी कारवीबद्दल आणखी वेगळ्याप्रकारची माहिती दिली. त्या म्हणाल्या, “बहर येऊन गेल्यानंतर वाळलेला फुलोरा सुद्धा अगदी मादक सुगंध निर्माण करतो ज्यामुळे वाळलेल्या कारवीच्या फुलांमधून चालणं देखील खूपच आनंददायी वाटतं. गुरांना ही वाळलेली फुलं खूप आवडतात. आणखी एक आश्चर्य म्हणजे स्थानिक अदिवासी जमाती याला “कैफ” म्हणतात. हा फारसी शब्द स्थानिक भाषेत कसा आला याचा अभ्यास देखील या निमित्ताने मजेशीर ठरू शकतो.”
परंतु या विलक्षण वनस्पतीचं भविष्यही एकंदरीत प्राणी आणि पर्यावरणाच्या भविष्यासारखंच संकटग्रस्त आहे. पाचगणी, मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, चोरला घाट, गोवा, अंबोली आणि मुन्नार येथे कारवी पर्यटनाला सुरुवात झाली आहे. पुण्याच्या निसर्गप्रेमी सायली पलांडे-दातार यांनी याविषयी बोलतांना खालील शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या, “पर्यावरण आणि त्याचे संवर्धन समजून घेण्याची ही अद्वितीय संधी फक्त फोटो काढण्याची संधी बनून राहणार नाही याची काळजी आयोजकांनी घेणे आवश्यक आहे.”
निलगिरीमध्ये अगदी ब्रिटीशांच्या काळापासून कुरुंजीच्या अधिवासांवर चहा, देवदार, वॉटल, निलगिरी इत्यादींची लागवड केली जात आहे तसेच धरणांसारखी “विकासकामेही” तिचा अधिवास बळकावत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या मर्यादित प्रसारामुळे कारवी अधिकच असुरक्षित बनली आहे. बेंगळूरू येथील नेशनल इंस्टीट्यूट ऑफ़ एडव्हान्स स्टडीजच्या पोस्ट डॉक्टरल स्कॉलर समीरा अग्निहोत्री यांनी Ageratina adenophora सारख्या वेगाने पसरणाऱ्या विदेशी वनस्पतींनीही बिलिगिरीरंगा पर्वतांमध्ये कुरुंजीच्या अधिवासावर ताबा मिळवला असल्याचे सांगितले.
शासकीय अधिकाऱ्यांनाही या परिस्थितीची जाणीव आहे. पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव, सुनील लिमये यांनी कारवीच्या अधिवासावर लागवड करण्याची पद्धत त्यांनी बंद केली असल्याचं सांगितलं. वर्गीस यांना कारवीचं बहरणं आणि पर्यावरण बदल यांच्यात असलेल्या संबधांचा अजून फारसा अभ्यास झालेला नसल्याची खंत आहे. त्यांनी बऱ्याचदा स्थानिक लोकांच्या तोंडून गेल्या काही वर्षांत फुलोरा विरळ होत गेल्याची तक्रार ऐकली आहे.
कारवीच्या या मनमोहक फुलोऱ्याचा माणसांच्या मनावरही प्रभाव न पडता तरच नवल. कारवी महोत्सवाच्या आयोजक, मंदाकिनी माथुर यांना ही कल्पना पाचगणीतील एक ज्येष्ठ आणि हाडाचे निसर्गप्रेमी, स्व. विनायक दीक्षित यांना आदरांजली म्हणून सुचली. त्यांनीच माथुर यांना १६ वर्षांपूर्वी पहिल्यांदा कारवीचं फुलणं दाखवलं होतं. यावेळी महोत्सवाच्या माहितीपुस्तिकेतील कारवीचं फुल आपल्या शाळेतील परिसरात फुललेलं पाहून आपल्याला कसा आश्चर्यकारकरित्या कारवीचा शोध लागला याबद्दल संजीवन शाळेतील जीवशास्त्राच्या एका शिक्षिकेनंही उत्साहानं सांगितलं.

यावेळी मी जमिनीवर पडलेली कारवीची काही फुलं माझ्या वहीत जपून ठेवण्यासाठी उचलली खरी पण मग त्या ओलसर मातीला सुवासित करणारी ती फुलं मी परत तिथंच टाकून दिली आणि २०२४ मध्ये कारवीला पुन्हा भेटण्याची इच्छा आपल्या मनात जपून ठेवायचं ठरवलं.

पियुष सक्सेरिया हे दिल्लीस्थित एक कन्सल्टंट आणि रिसर्चर आहेत. Our Tigers Return – Children’s Story Book – The Story of Panna Tiger Reserve (2009-2015) या पुस्तकाचे ते सहलेखकही आहेत.

First published in The Indian Express’s Sunday magazine EYE on 2 October 2016: http://indianexpress.com/article/lifestyle/life-style/look-the-karvi-is-flowering/

First published in Marathi Marathimati.com : http://www.marathimati.com/green/melavar-aali-karvi/

@@@@@