आनंदा बॅनर्जी, अनुवाद-परीक्षित सूर्यवंशी
एखादा कुत्रा शांत पडून राहत असेल,
येणाऱ्या-जाणाऱ्याकडे लक्ष देत नसेल आणि भुंकत नसेल तर कोणत्याही संवेदनशील
माणसाच्या मनाला ती गोष्ट चटका लावून जाते. न ओरडणाऱ्या बेडूकाचेही त्या भुंकता न
येणाऱ्या कुत्र्यासारखेच आहे. या शांततेला अर्थ आहे; विशेषकरून आता, जेव्हा जवळजवळ
संपूर्ण देशात पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. भारताच्या जास्तीतजास्त शहरांमध्ये,
रात्रीच्यावेळी पावसाच्या जोडीला बेडकाची डरावडराव ऐकू येईनाशी झाली आहे.
“आर्थिक विकासाच्या मागे लागलेले असतांना, आपण इतर सजीव प्राण्यांपासून दुरावले जात आहोत. बेडकासारखे लहान प्राणी तर आपल्या खिजगणतीतही नसतात. आपण कीटक मारण्यासाठी कीटनाशकांचा वापर करतो, कीटक नियंत्रण आणि निसर्गाचे नाजूक संतुलन राखण्यात बेडकाचे असलेले महत्त्व आपल्या लक्षातच येत नाही.” हे म्हणणे आहे बेट्राकोलॉजिस्ट के.एस.सेषाद्री यांचे. बेट्राकोलॉजी ही उभयचर प्राण्यांचा अभ्यास करणारी विज्ञानाची एक शाखा आहे.
जवळपास ३५ कोटी वर्षांपासून बेडकांचे या बुतालावर अस्तित्त्व आहे आणि ते अनेक परीसंस्थांचे अविभाज्य घातक आहेत. फोटो – निर्मल कुलकर्णी |
“आर्थिक विकासाच्या मागे लागलेले असतांना, आपण इतर सजीव प्राण्यांपासून दुरावले जात आहोत. बेडकासारखे लहान प्राणी तर आपल्या खिजगणतीतही नसतात. आपण कीटक मारण्यासाठी कीटनाशकांचा वापर करतो, कीटक नियंत्रण आणि निसर्गाचे नाजूक संतुलन राखण्यात बेडकाचे असलेले महत्त्व आपल्या लक्षातच येत नाही.” हे म्हणणे आहे बेट्राकोलॉजिस्ट के.एस.सेषाद्री यांचे. बेट्राकोलॉजी ही उभयचर प्राण्यांचा अभ्यास करणारी विज्ञानाची एक शाखा आहे.
दुर्मिळ होत चाललेल्या चिमण्यांविषयी लोकांमध्ये
होते तशी बेडकांविषयी चर्चा अद्याप होतांना दिसत नाही. कधीकाळी पावसाळ्यात अगदी
सहज नजरेस पडणाऱ्या कॉमन फ्रॉग, स्कीटरिंग फ्रॉग, क्रिकेट
फ्रॉग, बुल फ्रॉग आणि नेरो- माउथिड फ्रॉग या सगळ्या प्रजाती शहरांमधून हळूहळू
दिसेनाश्या झाल्या आहेत.
३५ कोटी वर्षांपासून बेडकांचे अस्तित्त्व
या भूतलावर आहे आणि ते कितीतरी जैव परिसंस्थांचे अविभाज्य घटक आहेत.
फोटो
– आनंदा बेनर्जी
Bi-colored frog (Clinotarsus curtipes)
भारतातील पश्चिम घाटात ही
प्रजाती आढळून येते. लहान असतांना यांचा रंग काळा असतो आणि जंगलातील संथ वाहणाऱ्या
प्रवाहांमध्ये ते थव्याने राहतात. |
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे फ्रॉग
स्पेशालिस्ट असलेले के.व्ही.गुरुराजा म्हणतात, “वातावरणातील सूक्ष्मातिसूक्ष्म
बदलांप्रतीही संवेदनशील असल्यामुळे उभयचरांची गणना सर्वोत्कृष्ट जैव शास्त्रीय सूचकांमध्ये
केली जाते म्हणूनच पर्यावरण संरक्षण आणि व्यवस्थापन कार्यात सरोगेट (surrogate) म्हणून
त्यांचा (या कार्यात असलेल्या त्यांच्या विशेष भूमेकेचा) उपयोग करता येऊ शकतो.”
फ्रॉग्स एन्ड टोड्स ऑफ वेस्टर्न घाट
(पश्चिम घाटातील फ्रॉग्स आणि टोड्स) हे पुस्तक लिहिल्यानंतर याच प्रयत्नाचा पुढचा भाग
म्हणून त्यांनी नुकतेच फ्रॉग फाईंड नावाचे अॅन्ड्रॉइड एप्लिकेशन सुरु केले आहे.
सेषाद्री म्हणतात, “पावसाशी बेडकांचा फार
पूर्वीपासून घनिष्ट संबंध आहे, ते निसर्गाचे चांगले सूचक मानले जातात. आर्द्रता
आणि तापमानातील बदलांना ते प्रतिसाद देतात. बेडकांसाठी अधिवासातील बदल विनाशकारक
ठरले आहेत, ते या शहरी इमारतींच्या जंगलात आपले
भरणपोषण करण्यास अगदी असमर्थ ठरले आहेत.”
उभयचरांच्या संख्येत धोकादायकरित्या होत असलेली घट ही एक जागतिक घटना आहे, वैज्ञानिकांसाठी ती एक चिंतेचा विषय बनली आहे. उभयचर हे किटकांवर जगतात; यात डासांचाही समावेश आहे; याउलट ते पक्षी आणि साप यांचे खाद्य आहेत, ते अन्नसाखळीच्या मध्यभागी आहेत आणि यामुळेच पर्यावरणीय आरोग्याचे ते महत्त्वाचे द्योतक आहेत.
उभयचरांच्या संख्येत धोकादायकरित्या होत असलेली घट ही एक जागतिक घटना आहे, वैज्ञानिकांसाठी ती एक चिंतेचा विषय बनली आहे. उभयचर हे किटकांवर जगतात; यात डासांचाही समावेश आहे; याउलट ते पक्षी आणि साप यांचे खाद्य आहेत, ते अन्नसाखळीच्या मध्यभागी आहेत आणि यामुळेच पर्यावरणीय आरोग्याचे ते महत्त्वाचे द्योतक आहेत.
त्यांच्या विशिष्ट जीवनचक्रासाठी आवश्यक
असलेल्या पाणी आणि जमिनीवरील वातावरणात होणाऱ्या अत्यंत सूक्ष्म बदलांशीही त्यांची
पातळ, ज्यातून पाणीही झिरपू शकते अशी त्वचा जुळवून घेऊ शकत नाही. अशाप्रकारे
वातावरणात होणाऱ्या बदलांबद्दल ते ताबडतोब धोक्याची सूचना देतात, ते जैव-सूचक
म्हणून काम करतात – ज्याप्रमाणे विसाव्या शतकात कोळश्याच्या खाणीत कॅनरी नावाचे
छोटे पिवळे पक्षी धोक्याची सूचना देण्याचे काम करत असे.
International Union for Conservation of
Nature (IUCN) च्या धोक्यात असलेल्या प्रजातींच्या रेड लिस्टनुसार, उभयचरांच्या १,८५६
प्रजातीं या लोप पावण्याच्या मार्गावर आहेत (ही संख्या म्हणजे उभयचरांच्या माहित
असलेल्या प्रजातींच्या ३२% एवढी आहे.) याशिवाय, संपूर्ण जगात ४२७ प्रजाती अत्यंत
धोकादायक, ७६१ धोकादायक आणि ६६८ असुरक्षित स्थितीत आहेत. उभयचरांच्या ५० प्रजाती
या केवळ गेल्या १५ वर्षांतच नष्ट झाल्या असल्याची भीती वैज्ञानिकांना आहे. यातील
१८ पेक्षा जास्त प्रजाती दक्षिण एशियातील आहेत.
सभोवती अशी
प्रतिकूल परिस्थिती असतांना भारतात २००० सालापासून आतापर्यंत उभयचरांच्या ११४ नवीन
प्रजातींच्या शोध लागला आहे. भारतात आढळून येणाऱ्या उभयचर प्रजातींची संख्या २००६
मधील २८१ वरून ३४२ वर (एप्रिलपर्यंत) पोहोचली आहे.
हे सर्व शोध एकतर पश्चिम घाटात लागले आहेत
नाहीतर ईशान्य भारताच्या प्राचीन जंगलात लागले
आहेत. ही दोन्ही ठिकाणे जैवविविधतेने संपन्न असलेल्या (Ecological hotspots) जगातील
मोजक्या ठिकाणांपैकी मानली जातात. परंतु
आता ती विकासाच्या नावाखाली येणाऱ्या विनाशाच्या झळांना तोंड देत आहेत.
Conservation Assessment and Management
Plan (CAMP) अंतर्गत भारतातील उभयचरांच्या जनगणनेसंबंधी करण्यात आलेल्या एका
मूल्यांकनानुसार ३२ प्रजाती या अत्यंत धोकादायक, ७१ धोकादायक, ५२ असुरक्षित, आणि ९
धोक्याच्या जवळ अशा स्थितीत आहेत. इतर ६३
प्रजातींबद्दल कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याचे येथे म्हटले आहे. ५० पेक्षा जास्त
प्रजाती नष्ट झाल्याचे मानले जाते.
वर उल्लेखिलेल्या शेवटच्या गटाचा शोध घेणे
हे मुख्य लक्ष्य आहे दिल्ली विद्यापीठाच्या एका कार्यक्रमाचे, ज्याचे नाव आहे – Lost!
Amphibians of India (भारताचे हरवलेले उभयचर!) या अभियानात २५० सदस्य सहभागी असून त्या अंतर्गत
देशातील विविध भागात ३० मोहिमा राबविल्या गेल्या आहेत.
ज्यांनी नवीन प्रजातींचा शोध लावला ते
सगळेच फ्रॉग स्पेशालिस्ट नाहीत. अनिल झचारिया, ज्यांनी
पश्चिम घाटात फ्रॉगच्या दोन मूळप्रजाती शोधल्या
आहेत ते व्हेटर्नरी सर्जन आहेत. एक अभियंता असलेल्या संजय सोंधी यांनी अरुणाचल
प्रदेशातील ईगलनेस्ट वन्यजीव अभयारण्यात बोम्पू लिटर फ्रॉगचा शोध लावला.
या शोधांनी (आणि पुनर्शोधांनी) बेट्राकोलॉजीच्या
अभ्यासाला चालना दिली आहे याचवेळी वैज्ञानिकही म्हणत आहेत कि विकासाच्या
रहाटगाड्याखाली भरडून नष्ट होण्यापूर्वीच नवीन पेशींची विज्ञानाला ओळख करून देणे खूप
गरजेचे आहे. हे काम म्हणजे काळाशी स्पर्धा करण्यासारखे आहे.
बेट्राकोलॉजिस्ट के.एस.सेषाद्री म्हणतात
“उभयचरांची जैवविविधता आणि परिसंस्था यांना पूर्णपणे समजून घेण्यासाठी आपल्याला अजून
बरेच प्रयत्न करावे लागतील”
|
सेषाद्री, यांनी दक्षिण पश्चिम घाटातील अगस्त्यमलाई
टेकड्यांमध्ये श्रब फ्रॉगची मूळप्रजाती Raorchestes ची नवीन प्रजाती शोधली,
ते पुढे म्हणतात, “दर दुसऱ्या वर्षी नवीन प्रजातींची ओळख होत आहे. त्यांच्या
परिसंस्था आणि त्यांचा नैसर्गिक इतिहास यांबद्दल आपल्याला खूपच कमी माहिती आहे.
जैव विविधता संरक्षणासाठी या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. जर आपल्याला उभयचरांचे
संरक्षण आणि संवर्धन करावयाचे असेल तर त्यांचा नैसर्गिक इतिहास, परिसंस्था आणि
त्यांची वर्तणूक यांची इत्थंभूत माहिती नोंदवून ठेवण्यावर भर देणे अत्यंत आवश्यक
आहे.”
भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी ६%
क्षेत्रफळ व्यापणारा पश्चिम घाट हा प्रदेश देशातील ३०% हून अधिक पृष्ठवंशीय प्राणी
आणि वनस्पतींच्या प्रजातींचे निवासस्थान आहे. या प्रदेशात फुलझाडांच्या ४,०००
पेक्षा जास्त प्रजाती आहेत (३८% प्रदेशनिष्ठ), फुलपाखरांच्या ३३०(११% प्रदेशनिष्ठ),
माशांच्या २८९(४१% प्रदेशनिष्ठ), उभयचरांच्या १३५(७८% प्रदेशनिष्ठ), सरपटणाऱ्या
प्राण्यांच्या १५७(६२% प्रदेशनिष्ठ), पक्ष्यांच्या ५०८(४% प्रदेशनिष्ठ) आणि सस्तन
प्राण्यांच्या १३७(१२% प्रदेशनिष्ठ) प्रजाती आहेत.
उच्च प्रतीची प्रदेशविशिष्टता असलेले
उभयचर हे पश्चिम घाटातील सर्वांत लक्षणीय असे पृष्ठवंशीय आहेत आणि म्हणूनच त्यांना
असलेला धोकाही सर्वाधीक आहे.
गुरुराजा म्हणाले, “जल आणि औष्णिक विद्युत
प्रकल्प, मोठी धरणे, अनियोजित शेती, वारंवार एकच पिक घेण्याची पद्धत, बेकायदेशीर
लाकूडतोड यांसारख्या विकास प्रकल्पांच्या नावाखाली मानवाने घडवून आणलेल्या
बदलांमुळे पश्चिम घाटावर आज प्रचंड ताण पडत आहे. “
ते पुढे म्हणाले, यामुळेच कधीकाळी दाट
असलेले येथील जंगल तुकड्यांमध्ये विभागले जाऊन विरळ झाले आहे. याचे परिणाम
वन्यजीवांच्या निवासक्षेत्राचे आकुंचन, पाणलोट क्षेत्रात वाहून येणाऱ्या
पाण्याच्या प्रमाणात आणि साठ्यात बदल, नदी-ओढे यांसारखे पाण्याचे प्रवाह आटत जाणे
आणि मानव-प्राणी संघर्ष अशा घटनांमधून
दिसून येत आहेत.
ईशान्य भारतातली परिस्थतीही यापेक्षा काही
वेगळी नाही. तेथे उभारण्यात आलेल्या अनेक जलविद्युत प्रकल्पांनी त्या प्रदेशातील
नाजूक परीसंस्थेला मोठा धोका निर्माण केला आहे. अधिवास विनाश हेच भारतातील
उभयचरांच्या संख्येत धोकादायक प्रमाणात होत असलेल्या ऱ्हासाचे प्रमुख कारण
असल्याचे आता म्हटले जात आहे.
WWF India च्या एका अहवालानुसार मागील १०
वर्षांत पूर्व हिमालयात १६ नवीन उभयचरांचा शोध लागला आहे.
हा अहवाल म्हणतो, “एक सेसिलीअन,
एक टोड आणि १४ वेगवेगळ्या प्रकारच्या बेडकांचा शोध गेल्या दशकात प्रथमच लागला.”
१९९८ ते २००८ दरम्यान पूर्व हिमालयात कमीत
कमी ३५३ नवीन प्रजातींचा शोध लावला गेला आहे. याचा अर्थ दरवर्षी ३५ नवीन प्रजाती! यात
२४२ वनस्पती, १६ उभयचर, १६ सरपटणारे प्राणी, २ पक्षी आणि २ सस्तन प्राणी आणि कमीत
कमी ६१ नवीन अपृष्ठवंशीय प्राण्यांचा समावेश आहे.
१९९४ सालच्या आपल्या “ट्रेकिंग द
व्हेनिशिंग फ्रॉग: अॅन इकोलॉजीकाल मिस्ट्री” या पुस्तकात जर्नलीस्ट केथरीन फिलिप्स
यांनी उभयचरांच्या नाशाची अनेक कारणे सांगितली आहेत. जसे – आम्ल पाऊस (Acid rain),
हवा आणि पाणी प्रदूषण, ओझोनचा पातळ होणारा थर, अतिनील किरणोत्सर्ग (अल्ट्राव्हायोलेट
रेडीएशन), दुष्काळ, अतिगुरचराई आणि जंगलतोड, रस्ता सोडून धावणारी वाहने, धरणे आणि
मुळच्या नसलेल्या माशांचे आगमन.
या पुस्तकात फिलिप्स म्हणतात, गरुड किंवा
मोठे मांसभक्षक प्राणी यांच्यासारखे प्रसिद्धीचे वलय न लाभल्यामुळे यांच्याकडे
(उभयचर) लोकांचे लक्षच जात नाही.
याचाच प्रतिध्वनी टीव्ही होस्ट असलेल्या
जेफ कोर्विन यांच्या २००८ सालच्या “द व्हेनिशिंग फ्रॉग” या माहितीपटात उमटतो.
यात ते म्हणाले, “बेडकाचा चित्तवेधकपणा
लोकांच्या नजरेत भरणे खरच अवघड होते. सध्या उभयचरांच्या ६००० प्रजाती आहेत आणि पुढील
काही वर्षांतच त्यातील ३००० आपण गमावून बसू.”
खाद्यासाठी होणारी बेडकांची बेकायदेशीर
तस्करी हा सुद्धा या प्राण्याच्या अस्तित्वाला असणारा एक गंभीर धोका आहे. या
व्यापारावर १९८५ सालीच बंदी घालण्यात आली होती परंतु आजही आंतरराष्ट्रीय स्तरावर
होणारी बेडकांच्या पायांची मागणी पुरविण्यासाठी बेकायदेशीर मार्गांनी त्यांना
जंगलातून पकडून नेले जाते. भारतात या बेकायदेशीर व्यापारात ग्रीन पाँड फ्रॉग आणि
इंडियन बुलफ्रॉग यांची तस्करी प्रामुख्याने केली जाते.
वातावरणातील बदलाने उभयचरांच्या
अस्तित्वाला अत्यंत गंभीर धोका निर्माण केला आहे. जोराचा पाऊस आणि नंतर दीर्घकाळ
दुष्काळ अशा दुष्टचक्राबद्दलच्या भविष्यवाणी ऐकल्यावर वाटते कि आता उभयचरांचे दुर्भाग्य
जवळपास निश्चितच आहे. निसर्गाने निर्माण केलेला डासांचा काळ आज स्वतःच्याच काळाशी
एक न जिंकता येणारी लढाई लढतो आहे.
First Published in Live mint: http://www.livemint.com/Politics/HgVXtBco9WraoSOhXG64cM/Frogs-disappear-from-urban-landscape.html
suryavanshipd@gmail.com
@@@@