पंकज सेक्सारिया, अनुवाद – परीक्षित सूर्यवंशी फोटोग्राफ्स–पंकज
सेक्सारिया
प्राणी सृष्टीतील सर्वाधिक आतुरतेने वाट पाहिल्या
जाणाऱ्या काही घटनांपैकी एक म्हणजे हजारो ऑलिव्ह रिडली समुद्री कासवांचे ओरिसाच्या
समुद्री किनाऱ्यावर घरटी बांधण्यासाठी होणारे आगमन. ही घटना इतकी नेत्रदीपक व
लोकप्रिय बनली आहे कि देशातील सर्व कासव येथेच आहेत अशी एक धारणा तयार झाली आहे
ज्यामुळे इतर कासवांच्या पेशी, कासव असणारे प्रदेश व त्यांच्या घरटी बांधण्याच्या
जागा या त्यांच्या गरीब बांधवांसारख्या दुर्लक्षिल्या जात आहेत.
या दुर्लक्षित बंधावांपैकी सर्वांत
महत्त्वाचे म्हणजे दूर बंगालच्या खाडीतील अंदमान आणि निकोबार बेटांवरील कासव. अंदमान
आणि निकोबारची बेटे ही खूप महत्त्वपूर्ण आहेत कारण ती कासवांच्या तीन जातींना घरटी
बांधण्यासाठी सर्वाधिक चांगली जागा आहे असे मानले जाते. त्या तीन जाती – जायंट
लेदरबॅक (Dermochelys
coriacea), ग्रीन सी टर्टल (Chelonia mydas), हाव्स्कबिल
(Eretmochelys imbricata) या आहेत. ऑलिव्ह रिडली(Lepdochelys
olivacea) सुद्धा येथे मोठ्या प्रमाणावर घरटी बांधतात.
जगभरातील समुद्रांमध्ये कासवांच्या फक्त
आठच प्रजाती सापडतात. या गोष्टीचा विचार करता हे खूप महत्वपूर्ण आहे. कासव हे
जास्तीतजास्त वेळ पाण्याखाली असतात परंतु त्यांना श्वास घ्यायला पृष्ठभागावर यावे
लागते. त्यांच्या श्वास घेण्याच्या क्षमतेवर हालचाली आणि ताण यांचा प्रभाव पडतो. म्हणूनच
दरवर्षी हजारो कासव मासेमारांच्या जाळ्यात अडकतात. समुद्री कासवांचे वैशिष्ट्य
म्हणजे मादी कासवांचे अंडी घालण्यासाठी थोडावेळ किनाऱ्यावर येणे वगळता ते एक
संपूर्ण समुद्री आयुष्य जगतात. खरतर अंडी घालण्याच्या या सवयीमुळेच ते मानवाला खूप
आधीपासून माहित आहेत. तमिळ साहित्यात तर अगदी चौथ्या शतकात याचा उल्लेख आढळतो.
साउथ सेंटीनल वाईल्डलाईफ अभयारण्यात ग्रीन सी कासव घरटे बांधतांना |
ग्रीन सी टर्टल हा लांबीला १ मीटर आणि
वजनाला १५० कि.ग्रॅ. पर्यंत वाढतो. याची अंडी रंगाने गडद निळी व काळसर असतात तर
वाढलेले कासव पिवळट हिरवे, हिरवे अथवा तपकिरी रंगाचे असून त्यावर तपकिरी किंवा
काळे डाग अथवा रेषा असतात. पाठीच्या कठीण कवचाखाली जमा होणाऱ्या हिरव्या चरबीमुळे याचे
नाव हिरवा समुद्री कासव पडले. ग्रीन सी टर्टल खूप मोठे स्थलांतर करण्यासाठी
प्रसिद्ध आहेत. त्याचे घरटे बांधण्याचे ठिकाण आणि चरण्याचे ठिकाण यांतील अंतर २५००
कि.मी. पर्यंत असू शकते. प्रौढ कासवे ही ज्या ठिकाणी अंडी घातली बरोबर त्याच
ठिकाणी परत येतात. मादी कासवे दर दोन ते चार वर्षाला समागम करतात तर नर कासवे
समागमार्थ दरवर्षी निपज भूमीला भेट देतात. हिरव्या समुद्री कासवांचा समागम काळ हा
त्यांच्या भौगोलिक स्थानानुसार बदलतो. कॅरेबिअन बेटांवर तो जून ते सप्टेंबर पर्यंत
असतो तर उष्णकटिबंधातील भागात तो पूर्ण वर्षभर चालू असतो. हिरवा समुद्री कासव
शाकाहारी असून तो समुद्रातील गवत व घास यांवर जगतो.
याच्याविरुद्ध लेदरबॅक कासव हा खोल समुद्रात राहतो. त्याचे प्रमुख खाद्य जेलीफिश आहे. खरतर लेदरबॅक हा सर्वाधिक खोल सूर मारणाऱ्या प्राण्यांपैकी एक मनाला जातो. या जातीच्या काही कासवांनी तर ४००० फुट खोल सूर मारल्याच्या नोंदी आहेत. लेदरबॅक हा समुद्री कासावांमध्ये सर्वांत मोठा असून चौथ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा आधुनिक सरपटणारा प्राणी आहे. हा लांबीला सहा फुट आणि वजनाला ६०० कि.ग्रॅ. पर्यंत वाढू शकतो. याचा माहित असलेला सर्वांत मोठा नमुना वेल्स नदीच्या किनाऱ्यावर नोंदला गेला आहे. तो लांबीला ३ मी. (१० फुट) आणि वजनाला ९०० कि.ग्रॅ. पेक्षाही जास्त होता. लेदरबॅक हा इतर समुद्री कासावांपेक्षा आणखी एका बाबतीत वेगळा आहे. ती म्हणजे त्याला इतरांसारखे हाडांचे कठीण कवच नसते. त्याचे कवच हे चामडी आणि तेलकट कातडीयुक्त मांसाने झाकलेले असते. यावरूनच त्याचे नाव लेदरबॅक पडले आहे. या महान लेदरबॅकचे शरीर सर्व कासावांमध्ये सर्वाधिक हायड्रो डायनामिक मानले जाते व त्याचा भौगोलिक पल्ला हा सर्वाधिक विस्तृत असतो. त्याच्या अस्तित्त्वाच्या नोंदी उत्तरेतील अलास्का आणि नॉर्वेपासून ते दक्षिणेत आफ्रिकेतील कॅप ऑफ गुड होप पर्यंत आणि अगदी दक्षिण कोपऱ्यात न्युझीलंडपर्यंत सापडतात. तो जगातील सर्वांत महान प्रवाशांपैकी एक आहेत. दोन वर्षांपूर्वी वैज्ञानिकांनी एका लेदरबॅक कासवाचा माग काढला ज्याने इंडोनेशियातून ते अमेरिकेतील ऑरीगोनपर्यंतचा २०,००० कि.मी. पर्यंतचा आपला अन्नशोधार्थ प्रवास हा ६४७ दिवसांत पोहून पूर्ण केला. अटलांटिक समुद्रातील फ्रेंच गयाना येथे पाहिलेल्या मादी कासवांना समुद्राच्या दुसऱ्या बाजूला मोरक्को आणि स्पेन येथे पुन्हा काबीज करण्यात आले.
याच्याविरुद्ध लेदरबॅक कासव हा खोल समुद्रात राहतो. त्याचे प्रमुख खाद्य जेलीफिश आहे. खरतर लेदरबॅक हा सर्वाधिक खोल सूर मारणाऱ्या प्राण्यांपैकी एक मनाला जातो. या जातीच्या काही कासवांनी तर ४००० फुट खोल सूर मारल्याच्या नोंदी आहेत. लेदरबॅक हा समुद्री कासावांमध्ये सर्वांत मोठा असून चौथ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा आधुनिक सरपटणारा प्राणी आहे. हा लांबीला सहा फुट आणि वजनाला ६०० कि.ग्रॅ. पर्यंत वाढू शकतो. याचा माहित असलेला सर्वांत मोठा नमुना वेल्स नदीच्या किनाऱ्यावर नोंदला गेला आहे. तो लांबीला ३ मी. (१० फुट) आणि वजनाला ९०० कि.ग्रॅ. पेक्षाही जास्त होता. लेदरबॅक हा इतर समुद्री कासावांपेक्षा आणखी एका बाबतीत वेगळा आहे. ती म्हणजे त्याला इतरांसारखे हाडांचे कठीण कवच नसते. त्याचे कवच हे चामडी आणि तेलकट कातडीयुक्त मांसाने झाकलेले असते. यावरूनच त्याचे नाव लेदरबॅक पडले आहे. या महान लेदरबॅकचे शरीर सर्व कासावांमध्ये सर्वाधिक हायड्रो डायनामिक मानले जाते व त्याचा भौगोलिक पल्ला हा सर्वाधिक विस्तृत असतो. त्याच्या अस्तित्त्वाच्या नोंदी उत्तरेतील अलास्का आणि नॉर्वेपासून ते दक्षिणेत आफ्रिकेतील कॅप ऑफ गुड होप पर्यंत आणि अगदी दक्षिण कोपऱ्यात न्युझीलंडपर्यंत सापडतात. तो जगातील सर्वांत महान प्रवाशांपैकी एक आहेत. दोन वर्षांपूर्वी वैज्ञानिकांनी एका लेदरबॅक कासवाचा माग काढला ज्याने इंडोनेशियातून ते अमेरिकेतील ऑरीगोनपर्यंतचा २०,००० कि.मी. पर्यंतचा आपला अन्नशोधार्थ प्रवास हा ६४७ दिवसांत पोहून पूर्ण केला. अटलांटिक समुद्रातील फ्रेंच गयाना येथे पाहिलेल्या मादी कासवांना समुद्राच्या दुसऱ्या बाजूला मोरक्को आणि स्पेन येथे पुन्हा काबीज करण्यात आले.
लेदरबेक ट्रेक्स – ग्रेट निकोबार आयलंड |
हाव्स्कबिल कासव – साउथ किंक आयलंड अभयारण्य |
हाव्स्कबिल कासव – साउथ किंक आयलंड अभयारण्य |
पूर्ण वाढलेला ऑलिव्ह रिडली हा कासव वरून ऑलिव्ह
ब्राऊन व खालून पिवळसर असतो. हाव्स्कबिल सारखाच तोही एक सर्वभक्षक आहे. समुद्री
कासावांमध्ये हा सर्वांत लहान असून एका प्रौढ कासवाची लांबी १ मीटरपेक्षाही कमी
असते व सरासरी वजन ५० कि.ग्रॅ. असते. ऐतिहासिकदृष्ट्या जगातील सर्व कासावांमध्ये ऑलिव्ह
रिडलीचे प्रमाण सर्वाधिक विपुल आहे असे मानले जाते. जगातील ८० देशांच्या समुद्र
किनाऱ्यांवर त्यांचा वावर आढळतो. त्यांची अंडी घालण्याची पद्धत हा निसर्गातील खरोखर
एक विलक्षण प्रकार आहे. खूप मोठ्या प्रमाणावर या कासवांचे समूह समुद्र किनाऱ्याजवळ
येतात आणि मग सगळेच, कधीकधी लाखो कासव एकदमच किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात. या
क्रियेला ‘arribada’ (स्पेनिशमध्ये ‘आगमन’) म्हटले जाते. बऱ्याच समुद्री
किनाऱ्यांवर तर घरट्यांची संख्या इतकी जास्त असते कि मादी कासवांना आधीच्या मादी
कासवांनी घातलेली अंडी उकरून काढून आपली अंडी घालण्यासाठी ती घरटी रिकामी करावी
लागतात. जगातील सर्व समुद्री किनाऱ्यांवर मिळून अंदाजे ८ लाख मादी दरवर्षी अंडी
घालतात. अंडी घालण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर येण्याची पद्धत आणि तिचे कारण
हे अजूनही बरोबर समजलेले नाही. तरीही समुद्री वारे, चंद्राच्या परिक्रमा आणि मादी
कासावांकडून सोडले जाणारे फेरोमोन (pheromones) हे काही घटक कारणीभूत असावेत असे
समजले जाते.
एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे
कासवांच्या सर्वच जाती धोक्यात आहेत आणि त्यांचा समावेश इंटरनेशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन
ऑफ नेचर (IUCN) च्या रेड डेटाबुकच्या संकटग्रस्त प्राण्यांच्या यादीत झालेला आहे. जगातील
कासवांची संख्या खूपच जलदगतीने कमी होतांना दिसून येत आहे. याची कारणे म्हणजे
समुद्री पाण्यात वाढत असलेले प्रदूषण, मासेमारांच्या जाळ्यात अडकून मरण, मांसासाठी
शिकार, घरटी नष्ट होणे आणि घरटी बांधण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या
किनाऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नामशेष होणे.
ओलिव्ह रिडली कासव घरटी बांधतांना – कथबर्ट बे वन्यजीव अभयारण्य |
अंदमान आणि निकोबार बेटांवरील कासवांचा Great
Andamanese, Onge आणि Nicobarese या आदिवासी जमातींकडून पारंपारिकरित्या नेहमीच
वापर झाला परंतु त्यांची छोटीशी लोकसंख्या आणि जगण्याला आवश्यक तेवढीच शिकार यांमुळे
कासवांना कधीच धोका पोहचला नाही.
तज्ञांच्या मते खरतर जेथे इतरांना प्रवेश नाही अशा आदिवासींसाठी राखीव प्रदेशांमुळे खूप मोठ्या प्रमाणावर कासव नष्ट होण्यापासून वाचले आहेत. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे लेदरबॅक कासव. यांची घरटी आता फक्त मानववस्ती नसलेल्या बेटांवर आणि आदिवासींसाठी राखीव प्रदेशांवरच दिसून येतात.
तज्ञांच्या मते खरतर जेथे इतरांना प्रवेश नाही अशा आदिवासींसाठी राखीव प्रदेशांमुळे खूप मोठ्या प्रमाणावर कासव नष्ट होण्यापासून वाचले आहेत. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे लेदरबॅक कासव. यांची घरटी आता फक्त मानववस्ती नसलेल्या बेटांवर आणि आदिवासींसाठी राखीव प्रदेशांवरच दिसून येतात.
भारत सरकार आणि युनायटेड नेशन्स
डीव्हेलपमेंट प्रॉग्राम यांचा एक प्रकल्प म्हणून २००१ मध्ये अंदमान अॅण्ड निकोबार
एन्व्हायर्नमेंट (ANET) ने एक अभ्यास प्रकल्प केला ज्यावरून असे लक्षात आले कि निकोबारची
बेटे ही जायंट लेदरबॅक कासवांच्या
संरक्षणासाठी जगातील सर्वांत महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक होऊ शकतात. या
सर्वेक्षणात असे लक्षात आले कि येथील बेटांच्या किनाऱ्यावर १,००० पेक्षा जास्त
कासवांनी घरटी बांधली जगात फक्त तीनच इतर अशा जागा आहेत जेथे १,००० पेक्षा जास्त
कासवे घरटी बांधतात. कासवांना असलेल्या धोक्यांची नोंदही या प्रकल्पात केली गेली. एकट्या
२०००-०१ च्या नेस्टिंग सिझनमध्ये जवळपास ४० टक्के लेदरबॅक यांच्या पंख, मान आणि
पाठीवर बोट प्रपॅलरने कापले गेल्याचे घाव होते. दक्षिणपूर्व अॅशियाकडून येणाऱ्या
मोठ्या जहाजांचे व बोटींचे याबद्दल आभार मानले पाहिजेत. त्या निकोबार बेटांच्या
दक्षिणेकडून अगदी जवळून जातात. ज्या बेटांवर घरटी बांधायची त्यांचे नष्ट होणे हा
सुद्धा कासवांसाठी एक खूप मोठा धोका आहे. १९८१ ते २००० दरम्यान कासवांच्या विविध
प्रजातींकडून नियमितपणे वापरले जाणारे कमीतकमी २१ समुद्री किनारे बेटांवर वाढत्या
बांधकाम क्षेत्राने खोदून नष्ट केले. पारंपारिक लाकडांचा उपयोग सोडून बेटांवर
राहणारे लोक आता मोठ्या प्रमाणावर सिमेंट कॉन्क्रीटचे बांधकाम करत आहेत आणि
त्यासाठी आवश्यक असणारी वाळू फक्त या समुद्र किनाऱ्यांवरच मिळते.
हाव्स्कबिल कासव – साउथ किंक आयलंड |
ही एक
सर्वज्ञात गोष्ट आहे कि पॉर्ट ब्लेअरच्या आजूबाजूला असलेले कॉर्बीन्स कोव्ह,
वांडूर आणि चिडियाटापू सारखे फक्त एका तासाच्या अंतरावर असणारे समुद्री किनारे
वाळू उपश्यामुळे मागली दोन दशकांत पूर्णपणे नष्ट झाले आहेत. हे सर्व समुद्री
किनारे पूर्वी कासवांच्या घरटी बांधण्याच्या महत्त्वाच्या जागा होत्या. रेव्ह.कॉर्बीन
(ज्यांच्या नावावरून या समुद्री किनाऱ्याचे नाव पडले) यांच्या १८६० साली असे
निदर्शनास आले कि कॉर्बीन्स कोव्ह या ठिकाणी “एक मोठा वालुकामय समुद्री किनारा
आहे” पॉर्ट ब्लेअरजवळ असलेले हे एक अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे परंतु तेथे जे
काही उरले आहे ते कॉर्बीन यांच्या म्हणण्याला कदाचितच पुष्टि देते. कासवांना घरटी
बांधण्यासाठी तेथे आता जागा नाही.
मध्य
अंदमानातील कासवांची एक खूप महत्त्वाची घरट्यांची जागा असलेले कथबर्ट बे
अभयारण्याची गोष्ट तर खूपच उपरोधिक आहे. अगदी अलीकडे या समुद्री किनाऱ्याचा एक भाग
कासव अभयारण्य म्हणून घोषित केला गेला त्याचवेळी दुसऱ्या भागात मात्र वाळू उपसा
होत राहिला ज्याचा कासावांवर खूपच विपरीत परिणाम झाला व अभयारण्याचा मूळ हेतूच
असाध्य राहिला. यामुळे येथे उभारण्यात आलेल्या पर्यटन प्रोत्साहनपर सुविधाही
कुचकामी ठरल्या.
कासवांच्या
नाशाचे आणखी एक मोठे कारण म्हणजे १८६० सालापासून ब्रिटिशांनी येथे आणलेले कुत्रे.
आपल्या मानवी मालाकांसोबत या बेटावर ती अगदी सर्वत्र पसरली आहेत आणि याचे परिणाम
कासवांसाठी अत्यंत भयंकर आहेत. कुत्री ही नियमितपणे कासवांची घरटी उकरून काढतात,
अंडी नष्ट करतात आणि अंड्यातून निघून समुद्राकडे जाणाऱ्या पिल्लांचाही ते नाश
करतात. एकदा (जानेवारी १९९८) मध्ये अंदमानातील कथबर्ट
बे कासव अभयारण्यात या लेखकाने स्वतः ऑलिव्ह रिडली
कासवांनी बांधलेल्या ताज्या २०० घरट्यांपैकी जवळपास ४० टक्के घरटी कुत्र्यांकडून एकाच
रात्रीत नष्ट होतांना पाहिली. कुत्र्यांनी मादी कासवांचा छळ करून त्यांच्यावर
हल्ले केल्याचीही उदाहरणे आहेत. यामुळे या कासवांना भयंकर ताण आणि इजा झालेल्या आहेत.
कासवांना
असलेल्या या विविध धोक्यांकडे गंभीरपणे आणि तातडीने लक्ष दिले पाहिजे. सर्वच
आघाड्यांवर उपययोजना करणे आवश्यक आहे. बांधकामासाठी वेगळे मध्यम शोधणे, कुत्र्यांना
आवर घालणे तसेच बेटांवरील लोकांकडून, खासकरून मासेमारांकडून होणारी कासवांची सारखी
कत्तल थांबविण्यासाठी कायद्यांची अधिक कठोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
या
बाबतीत कदाचित या बेटांवरील मूळ जमातींकडून काही धडा घेतला पाहिजे. त्यांचा
अनपेक्षित समजूतदारपणा खूप महत्त्वाचा आहे. छोट्याशा अंदमान बेटावरील ऑन्जे या मूळ
जमातीबद्दल अंदमान अॅण्ड निकोबार एन्व्हायर्नमेंट टीमने अशाच समजूतदारपणाची नोंद
केली आहे. ही २००६ मधील गोष्ट आहे जेव्हा ही संशोधक टीम डिसेंबर २००४ मध्ये
झालेल्या भयंकर विध्वंसक भूकंप आणि त्सुनामी यांचा कासावांवर काय परिणाम झाला याचा
अभ्यास करीत होती.
संशोधक
टीमने कासवांच्या स्थितीबद्दल विचारले असता एका वयस्क ऑन्जे सदस्याने सांगितले कि ते
आताच समुद्र किनाऱ्यावर कासवे पकडायला गेले होते कारण जमातीतील महिलांना कासवे
खायची होती. त्यांना काही कासवे मिळाली परंतु ती अत्यंत कृश, मांसहीन व कमजोर
होती. नंतर चर्चेतून असे लक्षात आले कि कासवे ज्यांवर आपले पोषण करतात ते समुद्री
घास व गवत भूकंप व त्सुनामीमुळे नष्ट झाले आहेत व म्हणूनच त्यांची अशी दुरवस्था
झाली आहे. त्यानंतर जोपर्यंत समुद्री घास वाढत नाही तोपर्यंत जमातीने त्यांची शिकार
न करण्याचा निर्णय घेतला.
प्राणी
जगताचे संरक्षण आणि मानवजात यांच्या गरजा नेहमी विरुद्ध असल्याचे दिसून येते परंतु
या गोष्टीच्या अगदी विरोधात अंदमान आणि निकोबार हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. कासावांकडून
घरटी बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या समुद्री किनाऱ्यांचा नाश हा काही निसर्गातील
केवळ एका वैभवशाली प्राण्याच्या अस्तित्त्वालाच धोका आहे असे नाही. या वातावरणावर
प्रत्यक्ष आश्रित असणाऱ्या मानवांनाही याची मोठी किंमत चुकवणे भाग आहे. पर्यावरणीय
आणि आर्थिकही. समजूतदारपणे निर्माण केलेल्या संरक्षण योजनेद्वारे अशी परिस्थिती
सहज निर्माण करता येऊ शकते ज्यात कोणीही हरणार नाही सर्वच विजयी होतील.
पंकज
सेक्सारिया हे ‘Troubled
Islands’ (2003) या अंदमान आणि निकोबार
बेटांवरील स्थानीय लोक व येथील पर्यावरण यावरील पुस्तकाचे लेखक आहेत. तसेच ते The
Jarawa Tribal Reserve Dossier Cultural and Biological
Diversities in the Andaman Islands (2010) चे सह संपादक आहेत.
===============================
परीक्षित सूर्यवंशी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा